भावपूर्ण आणि परिपूर्ण सेवा करणाऱ्या श्रीमती मंदाकिनी डगवार (वय ५९ वर्षे) सनातनच्या ११९ व्या समष्टी संतपदी विराजमान !
रामनाथी (गोवा), १० एप्रिल (वार्ता.) – श्रीरामनवमीच्या निमित्ताने साधक चैतन्य आणि आनंद अनुभवत असतांना हा आनंद द्विगुणित करणारी आनंदवार्ता साधकांना मिळाली ! श्रीरामनवमीच्या मंगलमयदिनी समष्टी साधनेची तीव्र तळमळ असणाऱ्या, साधकांच्या आध्यात्मिक प्रगतीचा ध्यास घेऊन त्यांना सातत्याने साधनेत आईप्रमाणे साहाय्य करणाऱ्या, तसेच भावपूर्ण आणि परिपूर्ण सेवा करणाऱ्या मूळ वर्धा येथील; मात्र सध्या रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात वास्तव्य करणाऱ्या सनातनच्या साधिका श्रीमती मंदाकिनी डगवार (वय ५९ वर्षे) या सनातनच्या ११९ व्या समष्टी संतपदी विराजमान झाल्या. श्रीसत्शक्ति सौ. बिंदा सिंगबाळ यांच्या शुभहस्ते भेटवस्तू देऊन पू. (श्रीमती) मंदाकिनी डगवार यांचा सन्मान करण्यात आला. ही आनंदवार्ता ऐकून सर्वांचा भाव जागृत झाला.