हिंदु तरुणाशी विवाह केल्यामुळे मुसलमान तरुणीच्या कुटुंबियांकडून तरुणाला मारहाण
तरुणीला तरुणाच्या घरातून पळवून नेले !
एरव्ही हिंदु तरुणीशी विवाह करणार्या मुसलमान तरुणांना हिंदूंनी विरोध केल्यावर मुसलमानांची पाठराखण करणारे निधर्मीवादी आता का बोलत नाहीत ?
कर्णावती (गुजरात) – येथे मुसलमान तरुणीने एका हिंदु तरुणाशी विवाह केल्यानंतर तिचे अपहरण करण्यात आले. या तरुणीच्या कुटुंबावर अपहरणाचा आरोप करण्यात आल्यानंतर या प्रकरणी ६ जणांना अटक करण्यात आली.
हिंदु तरुणाचे नाव ललित खांडवी आहे. ४ वर्षांपूर्वी त्यांची ओळख सिमरन मुलतानी नावाच्या तरुणीशी झाली होती. दोघांत प्रेमसंबंध निर्माण झाल्यानंतर गेल्यावर्षी त्यांनी देहली येथे पळून जाऊन आर्य समाज मंदिरात विवाह केला होता.
Gujarat: Muslim Family members kidnapped own daughter and thrashed her husband as they objected to the interfaith marriage, their daughter Simran Multani marrying a Hindu man Lalit Khandvi.https://t.co/zxQPRR86cu
— 𝐏𝐫𝐚𝐭𝐲𝐮𝐬𝐡 𝐒𝐚𝐲𝐚𝐧 𝐁𝐡𝐚𝐫𝐚𝐝𝐰𝐚𝐣 (@PratushSayan) April 10, 2022
३ मासांपूर्वी ते परत कर्णावती आले असता तरुणीचे कुटुंबीय ललित खांडवी यांच्या घरी आले. त्यांनी ललित खांडवी यांना मारहाण केली. चाकूचा धाक दाखवून ते सिमरन हिला बळजोरीने घेऊन गेले होते. त्यानंतर ललित खांडवी यांनी पोलिसांत तक्रार केली होती.