…तर श्रीराम, श्रीकृष्ण यांच्या जयंतीला सुटी का नाही ?
‘सुदर्शन’ वृत्तवाहिनीचे संपादक सुरेश चव्हाणके यांचा प्रश्न !
केंद्र सरकारच्या वार्षिक सुट्यांच्या सूचीत महंमद पैगंबर आणि येशू ख्रिस्त यांच्या जन्मदिनी अनिवार्य सुटी, तर हिंदूंच्या देवतांच्या जन्मदिनी प्रासंगिक का ? – चव्हाणके
मुळात असा प्रश्न निर्माण होण्याआधीच केंद्रातील भाजप सरकारने या दिशेने प्रयत्न करायला हवे होते, असेच हिंदूंना वाटते ! आतातरी प्रयत्न व्हावेत, ही अपेक्षा !
नवी देहली – जर महंमद पैगंबर आणि येशू ख्रिस्त यांच्या जन्मदिनाच्या सणांना अनुक्रमे ईद-ए-मिलाद आणि नाताळ म्हणून केंद्र सरकारकडून अनिवार्य सुटी घोषित केली जाते; मात्र श्रीराम, श्रीकृष्ण आणि भगवान शिव यांच्या जयंतीच्या दिवशी प्रासंगिक सुटी का दिली जाते ?, असा प्रश्न सुदर्शन वृत्तवाहिनीचे संपादक सुरेश चव्हाणके यांनी ट्वीट करून केला आहे.
#Jago मुहम्मद और ईसा के जन्म पर राष्ट्रीय छुट्टी देने वालों ने राम जी के नाम छुट्टी तो दूर रामनवमी पर रविवार की मिली छुट्टी के दिन भी परीक्षा रखी हैं। व्रत खोलना, कन्या पूजन मंदिर में दर्शन छोड़ #UPSC आज ही #NDA के लिए परीक्षा रख रही हैं। https://t.co/0w3vtTiwNq via @YouTube
— Suresh Chavhanke “Sudarshan News” (@SureshChavhanke) April 10, 2022
ट्वीटसोबत त्यांनी केंद्र सरकारचे वार्षिक सुट्ट्यांचे परिपत्रकही जोडले. या ट्वीटला भारतभरातील हिंदूंकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत असून ट्वीट मोठ्या प्रमाणात प्रसारित झाले आहे.