श्रीलंकेला आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी हवे २२ सहस्र कोटी रुपये !  

अर्थमंत्री अली साबरी

कोलंबो (श्रीलंका) – श्रीलंका दिवाळखोर झाला आहे. देशाकडे केवळ ५ सहस्र कोटी रुपयांची विदेशी चलनाची गंगाजळी शिल्लक राहिली आहे. या स्थितीतून श्रीलंकेला  बाहेर येण्यासाठी सुमारे २२ सहस्र कोटी रुपयांची आवश्यकता आहे.

जर हे आर्थिक साहाय्य मिळाले, तर श्रीलंका या संकटातून बाहेर पडू शकेल, असे अर्थमंत्री अली साबरी यांनी म्हटले आहे. भारताने ४ सहस्र कोटी रुपयांचे साहाय्य केले आहे.