कुतूबमिनार पूर्वीच्या विष्णु मंदिराचा ‘गरुड स्तंभ’ असल्याने ते हिंदूंकडे सोपवावे ! – विश्व हिंदु परिषद
मुळात अशी मागणीच करावी लागू नये, तर केंद्र सरकारने स्वतःहून याचा खरा इतिहास देशासमोर ठेवून हा ‘गरुड स्तंभ’ हिंदूंच्या नियंत्रणात द्यावा ! – संपादक
नवी देहली – येथील कुतूबमिनार परिसरात असलेल्या श्री गणेशाच्या मूर्ती स्थलांतरित करून संग्रहालयात ठेवण्याची मागणी करण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर विश्व हिंदु परिषदेच्या काही पदाधिकार्यांनी या ठिकाणी भेट दिली. त्यांनी कुतूबमिनार हिंदूंच्या कह्यात देण्याची आणि तेथे हिंदूंना पूजा करण्याची अनुमती देण्याची मागणी केली. मागणी मान्य न केल्यास न्यायालयात आव्हान देण्यात येईल, असेही त्यांच्याकडून सांगण्यात आले.
विश्व हिंदू परिषद ने कुतुब मीनार परिसर में स्थित 27 प्राचीन मंदिरों के पुनर्निर्माण की मांग उठाई है. वीएचपी ने कुतुब मीनार परिसर में पूजा करने देने की इजाजत भी मांगी है.#QutubMinar #VHP https://t.co/USFZMsIMLp
— Zee News (@ZeeNews) April 10, 2022
विहिंपचे प्रवक्ते विनोद बंसल म्हणाले की, कुतूबमिनार कोणत्याही विदेशी व्यक्तीने बनवलेले नाही, तर तो हिंदूंच्या विष्णु मंदिराचा ‘गरुड स्तंभ’ आहे ज्याला ‘विष्णु स्तंभ’ असेही म्हटले जाते. या विष्णु मंदिरासह येथील २७ अन्य मंदिरे, तसेच जैन मंदिरे पाडून या परिसरात मिनार आणि मशीद बांंधण्यात आली आहे; कारण या स्तंभावरील अन् येथील भिंतींवरील देवतांच्या मूर्ती त्याची साक्ष देत आहेत.