ऊना (हिमाचल प्रदेश) येथे धर्मांधाकडून १५ वर्षीय मुलीची हत्या
बलात्काराला विरोध केल्याचा परिणाम !
अशा वासनांध धर्मांधांवर जलद गती न्यायालयात खटला चालवून त्यांना फाशीचीच शिक्षा होण्यासाठी राज्यातील भाजप सरकारने प्रयत्न केला पाहिजे, असेच जनतेला वाटते ! – संपादक
ऊना (हिमाचल प्रदेश) – येथे एका १५ वर्षीय मुलीवर बलात्कार करण्याच्या प्रयत्नातून तिची हत्या केल्याच्या प्रकरणी महंमद आसिफ याला अटक करण्यात आली आहे. स्थानिकांनी आसिफ याला फाशीची शिक्षा करण्याची मागणी केली आहे.
Himachal Pradesh: Newspaper hawker Asif Mohammad arrested after he slit throat of minor girl, police urge people not to give it ‘communal’ colourhttps://t.co/sWZ5mFl1y9
— OpIndia.com (@OpIndia_com) April 9, 2022
आसिफ येथे वर्तमानपत्रांचे वितरण करण्याचे काम करत होता. वर्तमानपत्राचे पैसे घेण्यासाठी तो या मुलीच्या घरी गेला होता. घरात ती एकटीच असल्याचे पाहून त्याने तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा या मुलीने त्याला विरोध केला. यातून आसिफ याने धारदार शस्त्राद्वारे तिचा गळा चिरून तिला ठार केले.