मनुष्य जीवनातील टप्पे
परात्पर गुरु डॉक्टरांचे अध्यात्मविषयक मार्गदर्शन
‘१. जन्म, २. बालपण, ३. तरुणपण, ४. गृहस्थाश्रम, ५. वृद्धावस्था आणि ६. मृत्यू, या जीवनाच्या प्रत्येक टप्प्यातील ‘४. गृहस्थाश्रम’ या टप्प्यापर्यंत पुढच्या टप्प्याची खात्री असते; पण ‘५. वृद्धावस्था’ या टप्प्यापुढे टप्पाच नसल्याने, म्हणजे ‘मृत्यू’ असल्यामुळे पुढच्या टप्प्याचा विचार करता येत नाही. यासाठी आयुष्यभर साधना केली नसल्यास निदान वृद्धावस्थेत तरी तिचा आरंभ करावा, म्हणजे मृत्यूनंतरच्या जीवनाला थोडीतरी दिशा मिळू शकते !’
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले (१५.३.२०२२)