धर्मांध युवकाकडून हिंदु नाव धारण करून हिंदु युवतीशी लग्न आणि धर्मांतरासाठी दबाव
उत्तरप्रदेशमध्ये ‘लव्ह जिहाद’विरोधी कायदा केल्यानंतरही धर्मांध युवक हिंदु मुलींना फसवण्याचे दुःसाहस करतात, यावरून त्यांना कायद्याचे भय राहिले नसल्याचे दिसून येते. अशांवर कठोर कारवाई करणे अपेक्षित आहे !
बरेली (उत्तरप्रदेश) – येथील रफत या धर्मांध युवकाने ‘अंकित’ असे हिंदु नाव धारण करून एका हिंदु युवतीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले आणि मंदिरात जाऊन लग्न केले. त्याने तिच्यावर धर्मांतरासाठी दबाव टाकला, तसेच तिला मारहाण केली. याप्रकरणी पीडितेने करणी सेनेच्या कार्यकर्त्यांसमवेत जाऊन पोलीस तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी आरोपीच्या विरोधात प्रथमदर्शनी माहिती अहवाल नोंदवला आहे.
बरेली में सामने आया लव जिहाद का मामला https://t.co/4IDrHoHbMh
— AajTak (@aajtak) April 5, 2022
पीडित युवतीने सांगितले की, लग्नानंतर जेव्हा तिला समजले की, तिचा पती हिंदु नसून मुसलमान आहे, तेव्हा तिला मोठा धक्का बसला. याविषयी तिने त्याला जाब विचारला. तेव्हापासून त्याने तिला मारहाण करणे चालू केले.’ रफत याने तो विवाहित असल्याचेही तिच्यापासून लपवले होते.