‘इंस्टाग्राम’वर धर्मांधाची हिंदु मुलींवर बलात्कार करून त्यांची हत्या करण्याची धमकी !
आसाम पोलिसांचे स्वत:हून लक्ष घालून अन्वेषण
८० कोटी असलेल्यांना ‘अल्पसंख्य’ म्हणवल्या जाणार्या समाजाकडून ठार मारण्याच्या धमक्या मिळणारा जगातील एकमेव देश भारत ! – संपादक
गौहत्ती (आसाम) – इन्स्टाग्रामवर एक ध्वनिचित्रफीत प्रसारित झाली असून त्यात सबनम नावाची महिला आणि तिचा मित्र नदीम यांनी उघडपणे हिंदूंना धमकी दिली. त्यांनी हिंदू आणि त्यांच्या आई-बहिणींना पुष्कळ शिव्या दिल्या. या ध्वनीचित्रफितीत ‘हिंदू जगातील सर्वात वाईट जात आहे’, तसेच ‘हिंदूंच्या बहिणींवर बलात्कार करून त्यांची हत्या करू’, असे म्हटले आहे. या प्रकरणाकडे गौहत्ती पोलिसांनी स्वत:हून लक्ष घातले असून ते अन्वेषण करत आहेत.
Guwahati Police take cognizance of viral audio clip of Instagram Influencer and her friend on how to ‘rape and kill Hindus’https://t.co/LFq4jct3tj
— OpIndia.com (@OpIndia_com) April 7, 2022
या चित्रफितीत नदीम म्हणतांना दिसतो, ‘मी माझ्या डोळ्यांनी ३ हिंदूंना मरतांना पाहिले आहे. ते प्रतिदिन आमच्या भागात मरतात. त्यांना मारले पाहिजे. मी तर म्हणतो की, त्यांना उघडपणे मारा.’ नदीमच्या या वक्तव्यांवर सबनम जोरजोरात हसते. यानंतर नदीम म्हणतो, ‘हे लोक काल्पनिक जगात जगत आहेत. जर माझ्याकडे एके-४७ असती, तर मी हिंदूंना वेचून ठार मारले असते. मला ठार केले, तर माझ्यासारखे आणखी १०० जण निर्माण होतील.’ तो श्रीगणेश आणि भगवान शिवाच्या अर्धनारीश्वर रूप यांचीही चेष्टा करतो.