रामनाथी आश्रमात केलेल्या गरुडयागाचा परिणाम सप्तलोकावर होणे, यासंदर्भात महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाने केलेले अभिनव संशोधन !
यज्ञयागाविषयी अद्वितीय संशोधन करणारे महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय
‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे केलेली वैज्ञानिक चाचणी
‘यज्ञाचा सकारात्मक परिणाम सभोवतालच्या वातावरणावर होतो’, हे सर्वश्रुत आहे. महर्षींच्या आज्ञेने रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात अनेक यज्ञयाग करण्यात आले. या यज्ञयागांच्या संदर्भात ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने विपुल संशोधन केले आहे. या संशोधनातून ‘यज्ञयाग केल्याने यज्ञकुंड, यज्ञाचे यजमान अन् पुरोहित, यज्ञातील विविध घटक, तसेच सभोवतालचे वातावरण यांवर पुष्कळ सकारात्मक परिणाम होतो’, हे सिद्ध झाले आहे. ‘रामनाथी आश्रमात केलेल्या यज्ञांचा परिणाम संपूर्ण पृथ्वीवर, एवढेच नव्हे, तर सप्तलोकांपर्यंत होतो’, असे महर्षींनी आणि काही संतांनी सांगितले आहे. यासंदर्भातील वैशिष्ट्यपूर्ण संशोधन पुढे दिले आहे.
वाचकांना सूचना : ‘यू.ए.एस्.’ उपकरणाची ओळख’जागेअभावी या लेखातील ‘यू.ए.एस्.’ उपकरणाची ओळख’, ‘उपकरणाद्वारे करावयाच्या चाचणीतील घटक आणि त्यांचे विवरण’, ‘घटकाची प्रभावळ मोजणे’, ‘परीक्षणाची पद्धत’ आणि ‘चाचणीमध्ये सारखेपणा येण्यासाठी घेतलेली दक्षता’ ही नेहमीची सूत्रे सनातन संस्थेच्या goo.gl/tBjGXa या लिंकवर दिली आहेत. या लिंकमधील काही अक्षरे कॅपिटल (Capital) आहेत. |
१. रामनाथी आश्रमात २३.१.२०२२ या दिवशी झालेल्या गरुडयागाच्या वेळी सनातनचे दिवंगत २ साधक आणि देहत्याग केलेले २ संत यांची छायाचित्रे संशोधनासाठी आश्रमातील ३ विविध ठिकाणी ठेवण्यात येणे
परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली साधना करून अनेक साधक जलद आध्यात्मिक प्रगती करत आहेत. ‘सनातनच्या साधकांना मृत्यूत्तर महर्लाेक आणि सनातनच्या देहत्याग केलेल्या संतांना जनलोक, तपोलोक आदी उच्च लोकांची प्राप्ती झाली आहे. तसेच त्यांची पुढील साधना त्या त्या लोकांत चालू आहे’, असे परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी विविध प्रसंगी सांगितले आहे.
गरुडयागाच्या वेळी सनातनचे दिवंगत २ साधक आणि देहत्याग केलेले २ संत यांची छायाचित्रे संशोधनासाठी आश्रमात पुढील ठिकाणी ठेवण्यात आली.
२. निरीक्षणे आणि त्यांचे विवेचन
या प्रयोगातील साधक आणि संत यांच्या छायाचित्रांची यागापूर्वी आणि यागानंतर ‘यू.ए.एस्.’ उपकरणाद्वारे निरीक्षणे करण्यात आली. ती पुढे दिली आहेत.
वरील सारणीतून पुढील सूत्रे लक्षात आली.
१. साधक आणि संत यांच्या छायाचित्रांमध्ये यागापूर्वी ‘इन्फ्रारेड’ अन् ‘अल्ट्राव्हायोलेट’ या दोन्ही प्रकारच्या नकारात्मक ऊर्जा आणि पुष्कळ प्रमाणात सकारात्मक ऊर्जाही आढळून आली.
२. यागानंतर साधक आणि संत यांच्या छायाचित्रांतील नकारात्मकता नाहीशी होऊन त्यांच्यातील सकारात्मक ऊर्जा पुष्कळ प्रमाणात वाढली.
३. निष्कर्ष
प्रयोगात ठेवलेल्या साधक आणि संत त्यांच्या छायाचित्रांवर गरुडयागातील चैतन्याचा पुष्कळ सकारात्मक परिणाम झाला. विशेष म्हणजे सदर छायाचित्रे आश्रमात वेगवेगळ्या ठिकाणी ठेवूनही त्या छायाचित्रांवर झालेल्या परिणामाचा कल (ट्रेंड) सारखाच आहे.
४. साधक आणि संत यांच्या छायाचित्रांवर गरुडयागातील चैतन्याचा सकारात्मक परिणाम होण्याचे कारण
‘शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध आणि त्यांच्याशी संबंधित शक्ती एकत्र असते’, या तत्त्वानुसार साधक अन् संत यांच्या छायाचित्रांत त्यांची स्पंदने आहेत. ‘रामनाथी आश्रमात केलेल्या गरुडयागाचा परिणाम सप्तलोकांपर्यंत होतो’, असे महर्षींनी सांगितले आहे. रामनाथी आश्रमात झालेल्या गरुडयागातून प्रक्षेपित झालेले चैतन्य सप्तलोकांतील जिवांनी सूक्ष्मातून ग्रहण केले. याचा परिणाम प्रयोगातील साधक आणि संत यांच्या छायाचित्रांवर प्रतिबिंबित झाला. त्यामुळे यागानंतर त्यांच्या छायाचित्रातील नकारात्मक ऊर्जा नाहीशी होऊन त्यांच्यातील सकारात्मक ऊर्जेत पुष्कळ वाढ झाली.
‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभिनव संशोधन करण्याची संधी ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या साधकांना मिळाली’, यासाठी आम्ही सर्व साधक परात्पर गुरु डॉक्टरांच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहोत.’
– सौ. मधुरा धनंजय कर्वे, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (११.२.२०२२)
ई-मेल : mav.research2014@gmail.com
सनातनच्या रामनाथी आश्रमात झालेल्या गरुड यागाच्या संदर्भात सनातनचे दिवंगत २ साधक आणि २ संत यांच्या छायाचित्रांचे ‘यू.ए.एस्’ या वैज्ञानिक उपकरणाद्वारे केलेल्या चाचणीत लक्षात आलेल्या स्थुलातील सूत्रांमागील आध्यात्मिक कार्यकारणभाव !
१. रामनाथी आश्रमात झालेल्या गरुडयागाचा परिणाम सप्तलोकांवर होणे : ‘महर्षि किंवा प.पू. देवबाबा किंवा अन्य संत यांनी सांगितल्याप्रमाणे जेव्हा सनातनच्या रामनाथी आश्रमात विविध देवतांचे यज्ञयाग होतात, तेव्हा त्यांतून प्रक्षेपित झालेली दैवी शक्ती आणि चैतन्य यांचा परिणाम केवळ पृथ्वीपुरताच न होता ब्रह्मांडातील विविध लोकांवरही होतो. असाच परिणाम २३.१.२०२२ या दिवशी रामनाथी आश्रमात झालेल्या गरुडयागाचा झाला.
२. सनातनचे दिवंगत साधक आणि दिवंगत संत यांचे हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या दृष्टीने होणारे सूक्ष्मातील कार्य चालू असणे आणि या कार्याला विरोध करण्यासाठी त्यांच्यावर ६ व्या आणि ७ व्या पाताळांतील अनिष्ट शक्तींनी सूक्ष्मातून आक्रमणे करणे : सध्या कलियुगांतर्गत कलियुगाच्या उपकालचक्राचा अंत होऊन १००० वर्षांच्या कलियुगांतर्गत सत्ययुगाचा आरंभ होणार आहे. हा संधीकाळ असल्यामुळे पाताळांतील अनिष्ट शक्ती ‘पृथ्वीवर सत्ययुग येऊ नये’, यासाठी पूर्ण क्षमतेने पृथ्वी आणि उच्च लोक (महर्लाेक, जनलोक, तपोलोक आणि सत्यलोक) यांच्यावर आक्रमणे करत आहेत. कलियुगांतर्गत येणार्या सत्ययुगामध्ये पृथ्वीवर प्रथम सूक्ष्मातून आणि नंतर स्थुलातून हिंदु राष्ट्राची स्थापना होणार आहे. या अवतारी कार्यात केवळ पृथ्वीवरील सात्त्विक जीवच नव्हे, तर विविध लोकांमध्ये वास करणारे सात्त्विक जीव साहाय्य करत आहेत. ब्रह्मांडातील महर्लाेक, जनलोक, तपोलोक आणि सत्यलोक या विविध उच्च लोकांमाध्ये वास करणे सनातनचे दिवंगत साधक, संत, सद्गुरु आणि परात्पर गुरु (प.पू. परशराम पांडे महाराज आणि प.पू. कालिदास देशपांडे ) हे सनातन संस्था अन् तिच्याशी संलग्न असणार्या संस्था यांच्याशी जोडलेले जिज्ञासू, मुमुक्षू, हिंदुत्वनिष्ठ, राष्ट्रप्रेमी, धर्मप्रेमी आणि साधक यांना सूक्ष्मातून साहाय्य करत आहेत. त्यामुळे विविध उच्च लोकांमध्ये वास करणारे सनातनचे दिवंगत साधक, संत, सद्गुरु आणि परात्पर गुरु (प.पू. परशराम पांडे महाराज आणि प.पू. कालिदास देशपांडे) यांच्या लिंगदेहांवर ६ व्या आणि ७ व्या पाताळांतील मोठ्या अन् मायावी अनिष्ट शक्ती सूक्ष्मातून आक्रमणे करत आहेत. त्याचा परिणाम त्यांच्या लिंगदेहावर होत आहे. व्यक्तीच्या लिंगदेहाची स्पंदने त्याच्या मागील जन्मातील, म्हणजे मृत्यूपूर्वीच्या स्थूलदेहाशी संबंधित असणार्या वस्तू उदा. छायाचित्र, वापरलेले वस्त्र, भांडी इत्यादींमध्येही काही प्रमाणात असतात. त्यामुळे लिंगदेहाच्या स्थितीचा परिणाम त्याच्या स्पंदनांशी जोडलेल्या वस्तूंवरही दिसून येतो. त्यामुळे जेव्हा लिंगदेहावर त्रासदायक शक्तीचे आवरण वाढते, तेव्हा त्याचे मृत्यूपूर्वीचे छायाचित्र किंवा त्याच्या वस्तू यांतून त्रासदायक स्पंदने येतात. त्याचप्रमाणे जर लिंगदेहामध्ये दैवी शक्ती कार्यरत झाली, तर त्याचे मृत्यूपूर्वीचे छायाचित्र किंवा त्याच्या वस्तू यांतून चांगली स्पंदने येतात. गरुडयागापूर्वी प्रयोगासाठी निवडलेले सनातनचे २ दिवंगत साधक आणि २ संत यांना होणारा अनिष्ट शक्तींचा त्रास वाढला होता. त्यामुळे त्यांच्या छायाचित्रांमध्ये ‘इन्फ्रारेड’ आणि ‘अल्ट्राव्हायोलेट’ ऊर्जा आढळली.
२ अ. (कै.) सौ. प्रमिला केसरकरकाकूंना अनिष्ट शक्तींचा त्रास असल्यामुळे ६ व्या पाताळातील अनिष्ट शक्तींनी त्यांच्यावर सूक्ष्मातून आक्रमणे केल्यामुळे त्यांचा परिणाम त्यांच्या लिंगदेहावर झाल्यामुळे त्यांच्या छायाचित्रात ‘इन्फ्रारेड’ आणि ‘अल्ट्राव्हायोलेट’ ऊर्जा अधिक प्रमाणात आढळणे : सौ. केसरकरकाकूंची मृत्यूच्या वेळी आध्यात्मिक पातळी ६८ टक्के होती. त्यामुळे त्यांना मृत्यूनंतर महर्लाेकाची प्राप्ती झाली. प्रयोगातील अन्य साधक आणि संत यांना अनिष्ट शक्तींचा त्रास नाही; परंतु सौ. केसरकरकाकू यांना व्यष्टी स्तरावर अनिष्ट शक्तींचा त्रास आहे. त्यामुळे त्यांच्या मृत्यूनंतर जेव्हा त्यांचा लिंगदेह महर्लाेकात गेला, तेव्हा ६ व्या पाताळातील अनिष्ट शक्तींनी त्यांच्या लिंगदेहावर नियंत्रण मिळण्यासाठी त्यांच्या लिंगदेहावर सूक्ष्मातून आक्रमणे केली. त्यामुळे त्यांच्या लिंगदेहात त्रासदायक शक्ती गेल्यामुळे त्यांच्या छायाचित्रात ‘अल्ट्राव्हायोलेट’ ऊर्जा आढळली. त्याचप्रमाणे ‘त्यांच्या लिंगदेहाला ईश्वरी चैतन्य ग्रहण आणि प्रक्षेपित करता येऊ नये’, यासाठी त्यांच्या लिंगदेहाच्या भोवती ६ व्या पाताळातील मायावी अनिष्ट शक्तींनी सूक्ष्मातून मायावी त्रासदायक धूर सोडल्यामुळे त्यांच्या लिंगदेहाभोवतीही पुष्कळ प्रमाणात त्रासदायक शक्तीचे आवरण आले. यामुळे त्यांच्या छायाचित्रात ‘इन्फ्रारेड’ ऊर्जा आढळली. त्यामुळे सौ. केसरकरकाकूंची भावावस्था काही प्रमाणात न्यून झाली.
२ आ. पू. (कै.) श्रीमती शालिनी माईणकरआजी यांच्या लिंगदेहाकडून जनलोकात आणि पृथ्वी यांच्या दिशेने रामतत्त्वमय चैतन्य अन् आनंद यांच्या लहरींचे अधिक प्रमाणात प्रक्षेपण होणे, याला अवरोध निर्माण करण्यासाठी ७ व्या पाताळातील अनिष्ट शक्तींनी त्यांच्यावर सोडलेल्या त्रासदायक शक्तीचा परिणाम त्यांच्या लिंगदेहावर झाल्यामुळे त्यांच्या छायाचित्रात ‘इन्फ्रारेड’ अन् ‘अल्ट्राव्हायोलेट’ या नकारात्मक ऊर्जा अधिक प्रमाणात आढळणे : पू. माईणकरआजी या प्रभु श्रीरामाच्या भक्त आहेत. त्यामुळे त्यांच्या लिंगदेहाकडून जनलोकात आणि पृथ्वी यांच्या दिशेने रामतत्त्वमय चैतन्य आणि आनंद यांच्या लहरींचे अधिक प्रमाणात प्रक्षेपण झाले. पृथ्वीवर हिंदु राष्ट्राची स्थापना करण्यासाठी रामतत्त्वमय चैतन्य आणि आनंद यांच्या लहरी सर्वाधिक पूरक असल्यामुळे ७ व्या पाताळातील अनिष्ट शक्तींनी पू. माईणकरआजींच्या समष्टी साधनेत अडथळे निर्माण करण्यासाठी त्यांच्यावर सगुण-निर्गुण स्तरावरील त्रासदायक शक्ती प्रक्षेपित केली. त्यामुळे त्यांच्या लिंगदेहात सूक्ष्मतम स्तरावर कार्यरत झालेल्या त्रासदायक शक्तीमुळे त्यांच्या छायाचित्रात ‘अल्ट्राव्हायोलेट’ ऊर्जा आढळली. पू. माईणकरआजींकडून सूक्ष्मतम स्तरावर प्रक्षेपित होणार्या चैतन्यात अवरोध निर्माण करण्यासाठी ७ व्या पाताळातील अनिष्ट शक्तींनी पू. माईणकरआजींच्या लिंगदेहावर निर्गुण-सगुण स्तरावरील मायावी त्रासदायक शक्ती प्रक्षेपित केल्यामुळे त्यांच्या लिंगदेहाभोवती निर्माण झालेल्या मायावी त्रासदायक आवरणामुळे त्यांच्या छायाचित्रात ‘इन्फ्रारेड’ ऊर्जा आढळली. त्यामुळे पू. माईणकरआजींच्या लिंगदेहाकडून जनलोक आणि पृथ्वी यांच्या दिशेने प्रक्षेपित होणार्या रामतत्त्वमय चैतन्य अन् आनंद यांच्या लहरींचे प्रमाण २० टक्के न्यून झाले.
३. चारही छायाचित्रांतील नकारात्मक ऊर्जा नाहीशी होऊन त्यांच्यातील सकारात्मक ऊर्जेत पुष्कळ वाढ होण्यामागील कार्यकारणभाव : गरुडामध्ये २० टक्के विष्णुतत्त्व आहे. सनातनच्या रामनाथी आश्रमात स्थुलातून झालेल्या गरुडयागातून संपूर्ण ब्रह्मांडात श्रीविष्णूचे २० टक्के तत्त्व कार्यरत झाले. त्यातून प्रामुख्याने काळानुसार आवश्यक असणारी विष्णुतत्त्वमय मारक शक्ती आणि चैतन्य यांचे प्रक्षेपण झाले. चैतन्य लहरींच्या प्रक्षेपणामुळे विविध लोकांतील जीव किंवा लिंगदेह यांच्यावरील त्रासदायक आवरण नष्ट झाले आणि मारक शक्तीच्या प्रक्षेपणामुळे त्यांच्या देहातील किंवा लिंगदेहातील त्रासदायक शक्ती नष्ट झाली. त्यामुळे प्रयोगातील सनातनचे दिवंगत साधक आणि दिवंगत संत यांच्या लिंगदेहातील अन् लिंगदेहाच्या भोवती असणारी त्रासदायक शक्ती पूर्णपणे नष्ट होऊन त्यांच्यामध्ये सकारात्मक उर्जा कार्यरत झाली.
३ अ. (कै.) सौ. प्रमिला केसरकरकाकू आणि पू. (कै.) श्रीमती शालिनी माईणकरआजी यांच्या छायाचित्रांतील सकारात्मक ऊर्जेत सर्वाधिक वाढ होण्यामागील कार्यकारणभाव : सौ. केसरकरकाकू यांच्या मनात विष्णुस्वरूप परात्पर गुरु डॉ. आठवले आणि पू. माईणकरआजी यांच्या मनात प्रभु श्रीरामाप्रती अधिक भाव होता. त्याचप्रमाणे त्यांची सूक्ष्मातील दैवी लहरी धारण करण्याची क्षमताही अधिक होती. त्यामुळे सौ. केसरकरकाकू आणि पू. श्रीमती माईणकरआजी यांच्या लिंगदेहांमध्ये अधिक प्रमाणात सकारात्मक ऊर्जा ग्रहण होऊन ती पुष्कळ प्रमाणात कार्यरत झाली आणि चैतन्यलहरींच्या रूपाने त्यांच्या लिंगदेहातून प्रक्षेपित झाली. त्यामुळे सौ. केसरकरकाकू आणि पू. माईणकरआजी यांच्या छायाचित्रांतील सकारात्मक ऊर्जेची वाढ सर्वाधिक आहे.
४. सप्तलोकातील जिवांनी गरुडयागातील विविध स्तरांवरील चैतन्य ग्रहण केल्यामुळे त्यांना आध्यात्मिक स्तरावरील झालेले विविध प्रकारचे लाभ
टीप – वरील सारणीतून लक्षात येते की, पृथ्वीवर सनातनच्या रामनाथी आश्रमात स्थुलातून केलेल्या यज्ञयागांतून प्रक्षेपित झालेल्या चैतन्यामुळे भुवलोक आणि स्वर्गलोक येथे रहाणार्या जिवांना व्यष्टी, महर्लाेकातील जिवांना अधिक प्रमाणात व्यष्टी आणि अल्प प्रमाणात समष्टी, अन् जनलोक, तपोलोक आणि सत्यलोक येथील जिवांना समष्टी स्तरावर पुष्कळ प्रमाणात लाभ होतो. जन, तप आणि सत्य या लोकांतील उन्नतांकडून प्रक्षेपित झालेल्या चैतन्याचा लाभ ब्रह्मांडातील विविध लोकांमध्ये वास करणार्या जिवांना होतो. त्यामुळे जन, तप आणि सत्य या लोकांत वास करणार्या उन्नतांचे सूक्ष्मातील जीवन अधिक प्रमाणात समष्टीशी संबंधित असल्यामुळे त्यांच्याकडून संकल्प आणि अस्तित्व यांच्या स्तरावर समष्टी कल्याणाचे कार्य होते. असेच कार्य पृथ्वीवर रहाणारे संत, सद्गुरु आणि परात्पर गुरु यांचेही असते. यावरून आपल्याला पृथ्वीवर स्थुलातून आणि जन, तप अन् सत्य या लोकांत सूक्ष्मातून वास करणारे संत, सद्गुरु आणि परात्पर गुरु यांचे आध्यात्मिक महत्त्व लक्षात येते.
५. गरुडयागाच्या दिवशी रामनाथी आश्रमातील ३ निरनिराळ्या ठिकाणी ठेवलेल्या २ साधक आणि २ संत यांच्या छायाचित्रांत यज्ञानंतर पालट होणे
कृतज्ञता : ‘श्रीगुरूंच्या कृपेमुळे गरुडयागाशी संबंधित असणार्या स्थूल आणि सूक्ष्म अशा दोन्हीस्तरांवरील सूत्रांचे आध्यात्मिक परिभाषेत ज्ञान मिळाले’, यासाठी मी श्रीगुरूंच्या चरणी कोटीश: कृतज्ञ आहे.’
– कु. मधुरा भोसले (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान, आध्यात्मिक पातळी ६३ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२६.१.२०२२ रात्री ८)
|