मुंबई वेगळी करण्याच्या भाजपच्या कटाचे किरीट सोमय्या हे सूत्रधार ! – संजय राऊत, खासदार
मुंबई – मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्याचे ‘प्रेझेंटेशन’ भाजपने सिद्ध केले आहे, हे सत्य आहे. मुंबईला केंद्रशासित प्रदेश करण्याचे भाजपचे प्रयत्न चालू आहेत. या कटाचे सूत्रधार भाजपचे नेते किरीट सोमय्या हे आहेत, असा आरोप शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. सोमय्या यांच्या समवेत वाराणसीमधील एक व्यक्ती आणि मुंबईतील भाजपशी संबंधित एक बांधकाम व्यावसायिक यात सहभागी असून यासाठी पैसे जमावण्याचे काम चालू असल्याचे ते म्हणाले.
‘मुंबईवर केंद्राचे राज्य आणायचे आहे. हा महाराष्ट्रद्रोह आहे. किरीट सोमय्या यांनी नौटंकी बंद करावी. त्यांनी विक्रांतसाठी गोळा केलेल्या पैशाचा हिशोब द्यावा. तुम्ही देशाला आणि महाराष्ट्राला फसवत आहात’, असेही राऊत यांनी म्हटले.