गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी घेतले श्री महालक्ष्मीदेवीचे दर्शन !

श्री महालक्ष्मीदेवीचे दर्शन घेतांना  गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

कोल्हापूर, ८ एप्रिल (वार्ता.) – गोव्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ७ एप्रिल या दिवशी कोल्हापूर येथे साडेतीन शक्तीपिठांपैकी एक असलेल्या श्री महालक्ष्मीदेवीचे दर्शन घेतले. या वेळी त्यांच्या समवेत जनसुराज्य शक्ती पक्षाच्या युवामोर्चाचे प्रदेशाध्यक्ष श्री. समित कदम, तसेच अन्य कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.