आयकर विभागाकडून शिवसेनेचे उपनेते यशवंत जाधव यांच्या ४१ मालमत्ता कह्यात !
मुंबई – आयकर विभागाने शिवसेनेचे उपनेते आणि मुंबई महानगरपालिकेतील स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या आणखी ४१ संपत्ती कह्यात घेतल्या आहेत. या मालमत्तांमध्ये त्यांच्या आमदार पत्नी यामिनी जाधव यांच्याशी संबंधित मालमत्तांवरही कारवाई झाली आहे. कह्यात घेतलेल्या ४१ मालमत्तांमध्ये बिल्कवडी चेंबर बिल्डिंगमधील ३१ घरे (फ्लॅट) भायखळा येथील इंपिरिकल क्राऊन उपाहारगृह आणि वांद्रे येथील एका घराचा समावेश असल्याचे समजते. यशवंत जाधव यांनी महापालिकेत ज्या आस्थापनांना कंत्राटे दिली, त्यांचीही आयकर विभाग चौकशी करत आहे.