बेंगळुरू येथील ५ शाळांमध्ये बाँब ठेवल्याच्या इमेलद्वारे धमक्या
बेंगळुरू (कर्नाटक) – शहरातील ५ शाळांना धमकीचे इमेल पाठवण्यात आले असून यात शाळांमध्ये बाँब ठेवण्यात आल्याचे म्हटले आहे. यानंतर पोलिसांनी या शाळांमध्ये तपासणी चालू केली आहे; मात्र सायंकाळी उशिरापर्यंत या शाळांमध्ये बाँब सापडल्याचे वृत्त नाही. (ही माहिती जर खोटी असेल, तर अशा अफवा पसरवून सुरक्षायंत्रणांना वेठीस धरणार्यांवर कारवाई करा ! – संपादक)