कोपरगाव (नगर) येथील कब्रस्तान आणि ईदगाह यांच्या विकासासाठी १ कोटींचा निधी संमत !
अल्पसंख्यांकांच्या एकगठ्ठा मतांसाठी त्यांच्यावर योजनांची खैरात केली जाते. हिंदूंच्या करातून मिळालेल्या पैशांची अल्पसंख्यांकांवर उधळपट्टी करणे, हे हिंदूंना मान्य आहे का ? हिंदूबहुल देश असलेल्या भारतात हिंदूंपेक्षा अल्पसंख्य समाजालाच हिंदूंच्या पैशांतून पोसले जाते, हे हिंदूंचे दुर्दैवच ! |
कोळपेवाडी (नगर) – राज्याच्या अल्पसंख्यांक विभागाने कोपरगाव मतदारसंघातील अल्पसंख्यांकबहुल ग्रामीण क्षेत्रात असलेल्या कब्रस्तान आणि ईदगाह यांच्या विकासासाठी १ कोटी रुपयांचा निधी संमत केला आहे. ही माहिती श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना. आशुतोष काळे यांनी दिली. येथील कब्रस्तान आणि ईदगाह यांमध्ये सोयी-सुविधांचा अभाव असल्यामुळे मतदारसंघातील मुसलमानांनी या अडचणी काळे यांच्याकडे मांडल्या होत्या. काळे यांनी कब्रस्तान आणि ईदगाह यांच्या विकासाच्या हेतूने निधी मिळावा, यासाठी अल्पसंख्यांक विभागाकडे पाठपुरावा चालू केला. त्याची नोंद घेऊन विभागाने वरील निधी संमत केला.
धामोरी, माहेगाव देशमुख, करंजी, वाकडी आदी ठिकाणी असलेल्या कब्रस्तानांना संरक्षक भिंत बांधणे, मंडपस्थळाचे काँक्रिटीकरण करणे, अल्पसंख्यांक वस्तीमध्ये ‘पेव्हर ब्लॉक’ बसवणे आणि सुशोभिकरण करणे यांसारख्या कामांसाठी हा निधी वापरला जाणार आहे.
आशुतोष काळे म्हणाले, ‘‘सर्वधर्मसमभाव’ ही विचारसरणी डोळ्यांसमोर ठेवून राज्यातील महाविकास आघाडी सरकार सर्व घटकांना समान न्याय देण्याचा प्रयत्न करत आहे. माझ्याकडून मुसलमान बांधवांना रमजानच्या पवित्र महिन्याची ही भेट असून उर्वरित कब्रस्तान आणि ईदगाह मैदाने यांना निधी मिळवून देण्यासाठी माझे प्रयत्न चालू रहातील.’’