(म्हणे) ‘भारतातील मोदी सरकार ‘मुसलमान असणे’ हा गुन्हा ठरवत आहे !’
अमेरिकेतील महिला खासदार इल्हान उमर यांचा फुकाचा आरोप !
|
वॉशिंग्टन (अमेरिका) – भारतातील मोदी सरकार एखादी व्यक्ती ‘मुसलमान असणे’ हा गुन्हा ठरवत आहे, असा फुकाचा आरोप अमेरिकेतील महिला खासदार इल्हान उमर यांनी केला. त्यांनी भारताला अमेरिकेने दिलेल्या पाठिंब्याविषयी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. उमर यांनी ट्वीट करून ही टीका केली आहे. त्या म्हणाल्या की, मानवाधिकारांचे हनन होत असतांना बायडेन प्रशासन मोदी सरकारवर टीका करणे का टाळत आहेत ?
Why has the Biden Administration been so reluctant to criticize Modi’s government on human rights?
What does Modi need to do to India’s Muslim population before we will stop considering them a partner in peace?
These are the questions the Administration needs to answer. pic.twitter.com/kwO2rSh1BL
— Rep. Ilhan Omar (@Ilhan) April 6, 2022
उमर यांनी बायडेन प्रशासनाच्या उप परराष्ट्र सचिव वेंडी शर्मन यांना विचारले, ‘अमेरिकी सरकार भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारचे समर्थन का करत आहेत ?’ यावर शर्मन यांनी म्हटले की,आमच्या प्रशासनाने जगातील प्रत्येक धर्म, प्रत्येक जात, प्रत्येक वंश, विविधतेच्या प्रत्येक गुणवत्तेच्या समर्थनासाठी उभे राहिले पाहिजे, याविषयी मी सहमत आहे.