पानवळ-बांदा (जिल्हा सिंधुदुर्ग) येथील प.पू. दास महाराज यांच्या श्रीरामपंचायतन मंदिरातील देवतांच्या मूर्ती आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्र यांमध्ये जाणवलेले पालट
उद्या चैत्र शुक्ल नवमी (१०.४.२०२२) या दिवशी असलेल्या श्रीरामनवमीच्या निमित्ताने…
प.पू. दास महाराज यांच्या पानवळ-बांदा (जिल्हा सिंधुदुर्ग) येथील श्रीरामपंचायतन मंदिरातील देवता, समर्थ रामदासस्वामी आणि प.पू. रुक्मिणीमाता (प.पू. दास महाराज यांच्या मातोश्री) यांच्या मूर्ती अन् परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्र यांत झालेले पालट पुढे दिले आहेत.
१. मंदिरातील मूर्तींमध्ये जाणवलेले पालट
१ अ. श्रीरामाची मूर्ती
१ अ १. डोळे : श्रीरामाच्या डोळ्यांच्या पापण्यांतील निळसरपणा वाढला आहे. त्याचे डोळे पाणीदार दिसत आहेत, तसेच मूर्तीचे डोळे, पापण्या आणि ओठही हलतांना जाणवतात.
१ आ. समर्थ रामदासस्वामी यांची मूर्ती
१. तिच्यामधील तेज वाढले आहे.
२. मूर्तीचे डोळे, पापण्या आणि ओठही हलतांना जाणवतात.
३. नामजपाच्या वेळी श्वास घेत असतांना छातीची जशी हालचाल होते, तशी समर्थ रामदासस्वामींच्या मूर्तीच्या छातीची हालचाल होत असल्याचे जाणवते.
१ इ. प.पू. रुक्मिणीमाता (प.पू. दास महाराज यांच्या मातोश्री) यांची मूर्ती : पूर्वी त्यांची मान वाकलेली होती. आता त्यांची मान सरळ असून ‘त्या समोर पहात आहेत’, असे जाणवते, तसेच त्यांच्या पापण्यांची हालचाल होत असल्याचे जाणवते.
२. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या छायाचित्रात जाणवलेले पालट
‘आपण परात्पर गुरु डॉक्टरांच्या छायाचित्राकडे ज्या दिशेने पाहू, त्या दिशेने ते आपल्याकडेच पहात आहेत’, असे जाणवते.
३. मंदिरातील लाद्यांची चकाकी, गुळगुळीतपणा आणि प्रतिबिंब दिसण्याचे प्रमाण वाढणे
श्रीरामपंचायतन मंदिराच्या आतील बाजूच्या लाद्यांवर देवतांच्या मूर्ती आणि संतांची छायाचित्रे यांचे प्रतिबिंब पडते. लादीची चकाकी, गुळगुळीतपणा आणि प्रतिबिंब दिसण्याचे प्रमाण वाढत आहे.
– प.पू. दास महाराज, पानवळ-बांदा, जिल्हा सिंधुदुर्ग आणि सुश्री (कु.) माधवी पोतदार, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१८.२.२०२२)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |