‘सेक्युलॅरिझम्’चा सामना करण्यासाठी हिंदु राष्ट्राच्या विचारांचे लसीकरण करणे आवश्यक ! – अनिकेत अर्धापूरकर, हिंदु जनजागृती समिती

वर्धा येथे हिंदु राष्ट्र-जागृती सभा

हिंदु धर्मावर आघात करणाऱ्या समस्यांचे मूळ धर्मनिरपेक्षतेत आहे, हे जाणा ! – संपादक 

डावीकडून सौ. भार्गवी क्षीरसागर आणि श्री. अनिकेत अर्धापूरकर

वर्धा – गोहत्या, लव्ह जिहाद, धर्मांतर, हिंदुद्वेष आदी समस्यांचे ‘सेक्युलॅरिझम्’ (धर्मनिरपेक्षता) हे खरे मूळ आहे. कोरोना विषाणूपेक्षाही ‘सेक्युलॅरिझम्’चा विषाणू अधिक घातक आहे. त्याचा सामना करायचा असेल, तर हिंदूंच्या प्रथा-परंपरा आणि  सांस्कृतिक मूल्ये जपणाऱ्या अशा हिंदु राष्ट्राच्या विचारांचे लसीकरण करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे श्री. अनिकेत अर्धापूरकर यांनी केले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ५ एप्रिल या दिवशी बोरगाव (मेघे) येथील श्रीराम मंदिरामध्ये हिंदु राष्ट्र-जागृती सभा आयोजित करण्यात आली होती. यात ते बोलत होते. सभेला मोठ्या संख्येने हिंदु धर्मप्रेमी उपस्थित होते. सनातन संस्थेच्या सौ. भार्गवी क्षीरसागर यांनीही उपस्थितांना धर्माचरणाचे महत्त्व विशद करून सांगितले.

क्षणचित्रे

१. सभेत ‘मी हॅलो नाही, तर नमस्कार म्हणणार’, ‘वाढदिवस हिंदु संस्कृतीनुसार साजरा करणार’, ‘टिळा लावूनच घराबाहेर पडणार’, ‘घरावर भगवा ध्वज लावणार’ आणि ‘हलाल’ प्रमाणपत्र असलेली उत्पादने खरेदी करणार नाही’, असा निर्धार उपस्थित धर्मप्रेमींनी व्यक्त केला.

२. सभास्थळी सनातनचे ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांचे प्रदर्शन, तसेच थोर राष्ट्रपुरुषांविषयी माहिती देणारे प्रदर्शन लावण्यात आले होते.