बदलापूर येथील रामगिरी आश्रमाच्या वतीने ९ आणि १० एप्रिल या दिवशी विनामूल्य वैद्यकीय आरोग्य तपासणी शिबिर !
ठाणे, ७ एप्रिल (वार्ता.) – बदलापूर येथील संत प.पू. कृष्णानंद सरस्वती यांच्या कृपाशीर्वादाने येथील रामगिरी आश्रमाच्या वतीने विनामूल्य वैद्यकीय आरोग्य पडताळणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचा जास्तीतजास्त लोकांनी लाभ करून घ्यावा, असे आवाहन डॉ. स्वामी योगप्रताप सरस्वती यांनी केले आहे. बदलापूर (पूर्व) येथील आंबेशिव भागातील रामगिरी आश्रम येथे ९ एप्रिल या दिवशी सकाळी ९ ते सायंकाळी ६ या वेळेत नेत्र तपासणी शिबिर होणार आहे, तर १० एप्रिल या दिवशी सकाळी ९ ते सायंकाळी ६ या वेळेत स्त्रीरोग आणि बालरोग तपासणी शिबिर होणार आहे. अधिक माहितीसाठी ९८३३५३१४१८ या भ्रमणभाष क्रमांकावर श्री. संतोष यांना संपर्क साधावा.