किरीट सोमय्या यांच्या विरोधात ठाणे येथे शिवसैनिकांचे आंदोलन !
ठाणे, ७ एप्रिल (वार्ता.) – ‘आयएन्एस् विक्रांत’ या युद्धनौकेसाठी गोळा केलेल्या देणगीत भ्रष्टाचार करून पैसे खाल्ल्याचा आरोप करत भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्या विरोधात ७ एप्रिल या दिवशी ठाणे येथील शिवसैनिकांनी आंदोलन केले.
भिवंडीत किरीट सोमय्यांविरोधात जोडे मारो आंदोलन, शिवसैनिकांनी व्यक्त केला संताप – Lokmat https://t.co/kJcndhwocX #Bhiwandi
— Thane Times (@TimesThane) April 7, 2022
शिवसैनिकांनी किरीट सोमय्या यांच्या विरोधात घोषणा देऊन त्यांच्या प्रतिमेला जोडे मारले. आंदोलनकर्त्यांनी टेंभी नाका येथून ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढला.