(म्हणे ) ‘मुसलमानांना अस्पृश्य वागणूक देण्याचा प्रयत्न !’

फळ जिहाद’च्या विरोधात हिंदु संघटनांनी आवाज उठवल्याने ओवैसी यांचा थयथयाट

ऊठसूठ हिंदूंना लक्ष्य करणार्‍या ओवैसी यांनी कधी फळांना थुंकी लावून ती विकणार्‍या त्यांच्या धर्मबांधवांना तसे न करण्याची समज दिली आहे का ?

खासदार असुदुद्दीन ओवैसी

बेंगळुरू (कर्नाटक) – फळविक्रीच्या व्यवसायात मुसलमानांची मक्तेदारी नाही; मात्र हे निमित्त साधून राज्यात मुसलमानांना अस्पृश्य वागणूक देण्याचा प्रयत्न केला जात आहे, अशा शब्दांत ‘ए.आय.एम्.आय.एम्.’चे (ऑल इंडिया मज्लीस-ए-इत्तेहादुल मुस्लमीन) संस्थापक-अध्यक्ष तथा खासदार असुदुद्दीन ओवैसी यांना थयथयाट केला.

हिंदूंनी फळविक्रीच्या व्यवसायात सहभागी होऊन धर्मांध फळविक्रेत्यांची मक्तेदारी मोडून काढावी, असे आवाहन राज्यातील हिंदु संघटनांनी केले होते. त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करतांना ओवेसी यांनी ही टीका केली.