हिंदु जनजागृती समितीच्या वतीने कुर्कुंजे (कर्नाटक) येथे हिंदु राष्ट्र-जागृती सभा पार पडली !

हिंदूसंघटन आणि धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राची स्थापना यांसाठी हिंदु जनजागृती समिती

हिंदूंना धर्मशिक्षण असेल, तरच हिंदु राष्ट्र येणे शक्य ! – राजशेखर हेब्बार, अध्यक्ष, भारतीय संस्कृती प्रतिष्ठान, उडुपी

कुर्कुंजे (कर्नाटक) – हिंदूंना धर्मशिक्षण असेल, तरच हिंदु राष्ट्र येणे शक्य आहे. त्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने घेण्यात येणाऱ्या धर्मशिक्षणवर्गाचा लाभ सर्वांनी घ्यावा. हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी देशातील सर्व हिंदू संघटनांनी संघटित झाले पाहिजे, असे प्रतिपादन उडुपी येथील भारतीय संस्कृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. राजशेखर हेब्बार यांनी केले. ते उडुपी जिल्ह्यातील कुर्कुंजे गावात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने घेण्यात आलेल्या हिंदु राष्ट्र-जागृती सभेत बोलत होते.

या वेळी विद्वान वेदमूर्ती श्री. नेंपु अनंतेश भट, हिंदु जनजागृती समितीचे उडुपी जिल्हा समन्वयक श्री. विजय कुमार यांनी उपस्थितांना संबोधित केले. या सभेला २५० पेक्षा अधिक धर्मप्रेमी उपस्थित होते. कु. सौम्या यांनी सभेचे सूत्रसंचालन केले.

श्री. नेंपु अनंतेश भट सभेला संबोधित करतांना म्हणाले की, आजच्या स्थितीत हिंदूंचे संघटन होणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी सर्वांनी हिंदु जनजागृती समितीच्या धर्मकार्यात योगदान द्यायला हवे. श्री. विजय कुमार यांनी हिंदु राष्ट्राच्या आवश्यकतेविषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

वैशिष्ट्यपूर्ण

१. सभा संपल्यावर काही वेळातच जोराचा वारा, पाऊस आणि विजांचा कडकडाट होऊन संपूर्ण सभेचा व्यासपीठ खाली पडले आणि कनात पडली. सभा झाल्यावर वरील घटना घडल्याने ‘भगवंतानेच सर्वांचे रक्षण केले’, असा उपस्थितांचा भाव होता.

२. सभेची संपूर्ण सिद्धता २० धर्मप्रेमींनी केवळ २ दिवसांत केली.