मद्यांच्या दुकानांना महापुरुष आणि गड-दुर्ग यांची नावे देऊ नयेत ! – मुंबई महानगरपालिका
|
मुंबई – मुंबईतील दुकानांचे नामफलक मराठी भाषेत असावेत, मराठी भाषेतील नाव मोठ्या अक्षरात लिहिणे आवश्यक आहे, तसेच मद्याची व्रिकी करणारी दुकाने किंवा आस्थापने यांना महापुरुष आणि गड-दुर्ग यांची नावे देऊ नयेत, असा आदेश मुंबई महानगरपालिकेने दिला आहे. या नियमाचे उल्लंघन केल्यास दुकाने आणि आस्थापने यांच्या मालकांवर ‘महाराष्ट्र दुकाने आणि आस्थापना अधिनियम २०१७’ च्या अंतर्गत कारवाई केली जाणार आहे. याविषयी महानगरपालिकेकडून परिपत्रक काढले आहे.