राजौरी (जम्मू-काश्मीर) येथे शाळेत कुंकू लावून गेल्याने हिंदु विद्यार्थिनीला मारहाण !

काश्मिरातील हिंदू अजूनही आहेत असुरक्षित !

  • निसार अहमद या शिक्षकाने मारहाण केल्याचा कुटुंबाचा दावा !
  • अभिव्यक्तीस्वातंत्र्याचा ढोल बडवणारे, तसेच कर्नाटकातील हिजाब प्रकरणावरून धर्मांध मुलींच्या पाठीशी उभे रहाणारे कथित धर्मनिरपेक्षतावादी आणि पुरो(अधो)गामी आता कोणत्या बिळात जाऊन लपले आहेत ?
हिंदु विद्यार्थिनी

जम्मू (जम्मू-काश्मीर) – राजौरी जिल्ह्यातील एक हिंदु विद्यार्थिनी कपाळावर कुंकू लावून शाळेत गेल्याने निसार अहमद नावाच्या शिक्षकाने तिला मारहाण केल्याचा दावा विद्यार्थिनीच्या कुटुंबाने केला. या वेळी शिक्षिकेने अपशब्दांचाही वापर केला. या घटनेवरून जिल्ह्याच्या पोलीस उपायुक्तांनी शिक्षकाला निलंबित केले. सामाजिक माध्यमांतून या घटनेसंदर्भात अनेक तथ्ये बाहेर आल्याने ही कारवाई करण्यात आली. ही घटना ‘खदुरियन पंचायत द्रमन माध्यमिक शाळे’तील आहे. पोलीस पुढील अन्वेषण करत आहेत.

सौजन्य : India Today