परात्पर गुरु डॉक्टर, तुमच्या स्मरणानेच होते आम्हा सर्वांची उन्नती ।

साधकांची प्रतिभा जागृत करणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

परात्पर गुरु डॉ. आठवले

२५.१०.२०२१ या दिवशी नामजप करतांना मला परात्पर गुरु डॉक्टरांची पुष्कळ आठवण येऊन भावजागृती झाली. त्या वेळी त्यांच्या स्मरणातूनच पुष्कळ चैतन्य मिळाले आणि देवाने काही क्षणांतच मला पुढील ओळी सुचवल्या. त्या परात्पर गुरुदेवांच्या चरणी अर्पण करते.

श्रीमती मनीषा गाडगीळ

परात्पर गुरु डॉक्टर, तुमचे स्मरण म्हणजे पूजा ।
परात्पर गुरु डॉक्टर, तुमचे स्मरण म्हणजेच यज्ञ ।। १ ।।

परात्पर गुरु डॉक्टर, तुमचे स्मरण म्हणजे ध्यान ।
परात्पर गुरु डॉक्टर, तुमचे स्मरण म्हणजेच भाव ।। २ ।।

परात्पर गुरु डॉक्टर, तुमचे स्मरण म्हणजे चैतन्य ।
परात्पर गुरु डॉक्टर, तुमचे स्मरण म्हणजेच आनंद ।। ३ ।।

परात्पर गुरु डॉक्टर, तुमचे स्मरण म्हणजे शांती ।
परात्पर गुरु डॉक्टर, तुमचे स्मरण म्हणजेच भक्ती ।। ४ ।।

परात्पर गुरु डॉक्टर, तुमचे स्मरण हेच आम्हा साधकांचे विश्व ।
परात्पर गुरु डॉक्टर, तुमचे स्मरण
हेच आम्हा साधकांचे सर्वस्व ।। ५ ।।

परात्पर गुरु डॉक्टर, तुमचे स्मरण म्हणजे कृष्णतत्त्व ।
परात्पर गुरु डॉक्टर, तुमचे स्मरण म्हणजेच गुरुतत्त्व ।। ६ ।।

परात्पर गुरु डॉक्टर, तुमचे स्मरण हीच आम्हा साधकांची संपत्ती ।
परात्पर गुरु डॉक्टर, तुमच्या स्मरणानेच होते आम्हा सर्वांची उन्नती ।। ७ ।।

– श्रीमती मनीषा गाडगीळ (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के)  (वय ६० वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा (२६.१०.२०२१)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक