दमोह (मध्यप्रदेश) येथे धर्मांध सासर्याकडून सुनेवर बलात्कार
|
दमोह (मध्यप्रदेश) – येथे एका सुनेने तिच्यावर सासरा राशिद खान याने बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणी सासर्याच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात येऊन त्याला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी पतीच्या विरोधातही गुन्हा नोंदवण्यात आला असून तो सध्या पसार आहे.
मध्य प्रदेश के दमोह जिले की घटना, पुलिस कर रही मामले की जांच @ReporterRavish https://t.co/tDt6msx009
— AajTak (@aajtak) April 2, 2022
या महिलेने पत्रकारांना सांगितले की, माझा विवाह वर्ष २०२० मध्ये झाला होता. तेव्हापासून राशिद खान माझ्याकडे वाईट नजरेने पहात होता. त्यामुळे मी त्याच्यापासून स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न करत होते; मात्र मी स्वतःला वाचवू शकले नाही. जेव्हा पती घरी नसे, तेव्हा तो माझ्यावर बलात्कार करत असे. याविषयी कुणाला सांगितल्यास ठार मारण्याची धमकी तो देत असे. सासर्याच्या या कृत्याविषयी पतीला सांगितल्यावर त्याने मलाच फटकारले आणि सासर्याच्या कृत्याचे समर्थन केले.