केवळ भारतातच ध्वनीक्षेपकावर अजान का ऐकायला मिळते ? – सुप्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल
मुसलमान देशांत ध्वनीक्षेपकावर अजान ऐकवली जात नसल्याचेही सूतोवाच
नवी देहली – मी जगातील अनेक ठिकाणी फिरले आहे. आखाती देशांतही गेले आहे. तेथे ध्वनीक्षेपकावर बंदी आहे. मुसलमान देशांत ध्वनीक्षेपकावर अजान ऐकायला मिळत नाही. मग केवळ भारतातच ती का ऐकायला मिळते ?, असा प्रश्न सुप्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल यांनी उपस्थित केला. ‘झी न्यूज’ला दिलेल्या मुलाखतीत त्या बोलत होत्या.
Veteran singer Anuradha Paudwal seeks ban on loudspeakers Azaan, says even Muslim countries have banned ithttps://t.co/af0s2tKuuI
— OpIndia.com (@OpIndia_com) April 6, 2022
अनुराधा पौडवाल पुढे म्हणाल्या, ‘‘मी कोणत्याही धर्माच्या विरोधात नाही; पण देशात अशाच प्रकारे जर अजान देत राहिले, तर अन्यही लोक ध्वनीक्षेपकाद्वारे हनुमान चालिसा लावतील. यामुळे पुढे वाद निर्माण होतील. हे फार वाईट आहे.’’
हिंदूंनी ४ वेद, १८ पुराणे आणि ४ मठ यांविषयी जाणून घेतले पाहिजे !अनुराधा पौडवाल पुढे म्हणाल्या, ‘‘आपल्या मुलांना देशाच्या संस्कृतीची जाणीव करून दिली पाहिजे. ‘आदि शंकराचार्य हे आपले धर्मगुरू आहेत’, हे त्यांना कळायला हवे. हिंदूंनी ४ वेद, १८ पुराणे आणि ४ मठ यांविषयी जाणून घेतले पाहिजे.’’ |