(म्हणे) ‘भारताने रशियाकडून संरक्षण उपकरणांची खरेदी अल्प करावी !’

अमेरिकेची अप्रत्यक्ष धमकी

भारताने काय करावे आणि काय करू नये, हे अमेरिकेने सांगू नये, असे भारताने अमेरिकेला ठणकावले पाहिजे ! – संपादक

अमेरिकेचे संरक्षण सचिव लॉयड ऑस्टिन

वॉशिंग्टन (अमेरिका) – भारताने आगामी काळात रशियाच्या सैन्य साहित्यांवरील अवलंबित्व अल्प करावे, अशी अपेक्षा अमेरिकेचे संरक्षण सचिव लॉयड ऑस्टिन यांनी व्यक्त केली. ‘रशियाकडून संरक्षण उपकरणांची खरेदी करणे भारताच्या हिताचे नाही’ अशी अप्रत्यक्ष धमकीही त्यांनी दिली. ते अमेरिकेच्या संरक्षणविषयक बैठकीत बोलत होते.   ऑस्टिन पुढे म्हणाले की, आम्ही भारतासमवेत काम करत आहोत. रशियाच्या उपकरणांमध्ये गुंतवणूक करणे त्यांच्या (भारताच्या) हिताचे नाही, हे त्यांना समजले आहे. आमची पुढची मागणी ही आहे की, भारत ज्या रशियन उपकरणांमध्ये गुंतवणूक करत आहेत, ती न्यून करावी. अशा प्रकारच्या गोष्टींमध्ये अधिक गुंतवणूक करा, ज्यामुळे आपले संबंध सुरळीत रहातील.