पुणे येथील ‘युरो’ शाळेत सुरक्षारक्षकांकडून पालकांची अडवणूक !
पुणे – येथील उंड्री भागातील ‘युरो’ शाळेमध्ये गेलेल्या पालकांची प्रवेश शुल्काच्या सूत्रावरून अडवणूक करण्यात आली. पालकांनी ‘आमच्या मुलांना शाळेत प्रवेश का दिला नाही ?’, असा प्रश्न शाळा प्रशासनाला विचारण्याचा प्रयत्न केला; परंतु त्यांना प्रश्न विचारूनच दिला नाही. सुरक्षारक्षकांनी (‘बाऊन्सर्स’नी) पालकांना बराच वेळ फाटकाबाहेर थांबवले, असे ‘व्हिडिओ’तून दिसले. शिक्षणमंत्र्यांनी शाळेत सुरक्षारक्षक न ठेवण्याचे आदेश दिले असतांनाही शाळेमध्ये सुरक्षारक्षक आढळून आले. (याविषयी शाळा प्रशासनाला काय म्हणायचे आहे ? – संपादक)
शालेय शुल्काविषयी ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी शिक्षण उपसंचालकांकडे तक्रारी केल्या होत्या, त्या विद्यार्थ्यांना शाळेने दाखले पाठवले. नंतर पालक शाळेत आले होते; परंतु त्याविषयी कोणतीही माहिती दिली न गेल्याने पालक संतप्त झाले.