पिंपरी (जिल्हा पुणे) येथे कुरिअरने मागवल्या ९७ तलवारी, २ कुकरी, ९ म्यान !
संभाजीनगर पाठोपाठ पिंपरी येथे कुरिअरने एवढ्या मोठ्या प्रमाणात घातक शस्त्रे येणे गंभीर आहे ! यामागील सूत्रधार कोण आहे ? याचा शोध पोलिसांनी घेणे अपेक्षित आहे. अशा घटनांमुळे गुन्हेगारांवर पोलिसांचा धाक राहिलेला नाही, हे लक्षात येते. – संपादक
पिंपरी (जिल्हा पुणे) – कुरिअरने मागवलेल्या ९७ तलवारी, २ कुकरी, ९ म्यान, अशी ३ लाख २२ सहस्र रुपयांची शस्त्रे दिघी पोलिसांनी जप्त केली आहेत. या प्रकरणी ४ जणांच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे. संभाजीनगर येथे ‘डीटीडीसी’ कुरिअर आस्थापनामध्ये अवैधपणे तलवारींचा साठा आढळून आला होता. त्या अनुषंगाने सर्व कुरिअर आस्थापनांमध्ये येणाऱ्या सर्व पार्सलचे काळजीपूर्वक ‘स्कॅनिंग’ करण्याविषयी सूचना दिल्या होत्या. त्यानुसार ‘एक्स् स्कॅनिंग’ यंत्राद्वारे पडताळणी केली असता खोक्यामध्ये तलवारसदृश वस्तू आढळून आल्या.