(म्हणे) ‘गणेशोत्सवातील ‘डीजे’मुळे ध्वनीप्रदूषण होत नाही का ?’ – आमदार अबू आझमी
(‘डीजे’ म्हणजे मोठ्या आवाजातील ध्वनीक्षेपक यंत्रणा)
|
मुंबई – निवडणुका आणि मतांचे राजकारण यांसाठी राज ठाकरे हिंदु-मुसलमान यांच्यात वैर निर्माण करण्याचा अन् भांडणे लावण्याचा प्रयत्न करत आहेत. मशिदींवरील भोंग्यांमुळे ध्वनीप्रदूषणाची तक्रार असेल, तर गणेशोत्सव, नवरात्रोत्सव आणि विवाह समारंभ या वेळी लावल्या जाणाऱ्या ‘डीजे’मुळे ध्वनीप्रदूषण होत नाही का ? असा प्रश्न समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी प्रसिद्धीमाध्यमांसमोर उपस्थित केला. त्याविषयी कधी राज ठाकरे यांनी आवाज उठवला नाही, असेही त्यांनी सांगितले.
राज ठाकरेंच्या भाषणानंतर मशिदींवरील भोंग्यांच्या प्रकरणामध्ये अबू आझमींची उडी; म्हणाले “गणपती, नवरात्री, विवाह समारंभात…”https://t.co/INjbqr3jhi
समाजवादी पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांची पहिली प्रतिक्रिया#AbuAzmi #RajThackeray #MNS #Mosque #loudspeaker #Mumbai #Maharashtra #BJP— LoksattaLive (@LoksattaLive) April 5, 2022
ते पुढे म्हणाले, ‘‘गणेशोत्सव, नवरात्रोत्सव आदींमधील ‘डीजे’विरुद्ध आम्ही कधी तक्रार केली नाही. मशिदींसमोर हनुमान चालिसा लावणाऱ्यांनाही आम्ही थंड पाणी आणि सरबत देऊ. धार्मिक तेढ निर्माण करणारे राजकारण आम्हाला नको आहे.’’ (यापूर्वी सतत प्रक्षोभक विधाने करणाऱ्या आझमी यांचे हास्यास्पद विधान ! – संपादक)