परंडा (जिल्हा धाराशिव) येथे पशूवधगृहावर धाराशिव पोलिसांची धाड
२ धर्मांधांसह ८ जणांविरुद्ध गुन्हा नोंद
परंडा (जिल्हा धाराशिव) – येथील जामगाव रस्त्याजवळील पशूवधगृहावर पोलिसांच्या विशेष पथकाने धाड टाकून कारवाई केली. या कारवाईत ३ जिवंत गाई, ५०० किलो मांस आणि चारचाकी वाहने, असा एकूण २३ लाख ४० सहस्र रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. या प्रकरणी संदीप ओव्हाळ यांनी दिलेल्या तक्रारीवरून फाजील सौदागर आणि शोयब शेख यांच्यासह अन्य ६ अज्ञातांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. धाराशिव येथून ३ शासकीय वाहनांसह २३ अधिकारी आणि कर्मचारी यांच्या मोठ्या फौजफाट्यासह ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणाचे पुढील अन्वेषण पोलीस निरीक्षक हिंगे करत आहेत. (आरोपींना कठोर शासन झाल्यासच राज्यातील गोहत्या थांबतील. – संपादक)