मुंबईतील सर्व शाळांना नामफलक मराठीत देणे बंधनकारक !
मुंबई – मुंबईमधील सर्व शाळांचे फलक मराठी भाषेत असावेत, यासाठी मुंबई महानगरपालिकेने ५ एप्रिल या दिवशी परिपत्रक काढले आहे. मराठी भाषेचा अधिकाधिक वापर व्हावा यासाठी हा निर्णय घेण्यात आला असून महानगरपालिकेच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व माध्यमांच्या शाळांसाठी हा निर्णय बंधनकारक आहे. मुंबईमध्ये अनुदानित ३९४, विनाअनुदानित ६७८ आणि २१९ खासगी शाळा आहेत. सर्वांना नावाची पाटी मराठी भाषेत लावणे अनिवार्य आहे. असा निर्णय महाराष्ट्रातील सर्व शाळांसाठी शिक्षण विभागाने घ्यावा, यासाठी शिवसेनेच्या युवा सेनेच्या वतीने शालेय शिक्षणमंत्री यांना निवेदन दिले आहे.