मशिदींवरील भोंगे उतरवले नाहीत, तर आम्ही ध्वनीक्षेपकावर भजने लावू !
श्रीराम सेनेचे संस्थापक अध्यक्ष श्री. प्रमोद मुतालिक यांची चेतावणी
|
बेंगळुरू (कर्नाटक) – ध्वनीप्रदूषण रोखण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार मशिदींवरील भोंग्यांवर बंदी घालावी. शाळा, रुग्णालये यांसारख्या शांतता परिसराविषयीचे आदेशही मशीद व्यवस्थापकांकडून धुडकावले जातात. पहाटे ५ वाजता वाजणार्या मशिदींच्या भोंग्यांवर बंदी आणण्याची मागणी बेळगाव तहसीलदारांकडे केली आहे. मशिदीच्या भोंग्यांचा त्रास होत असल्याची तक्रार करूनही प्रदूषण नियामक मंडळाने त्यावर काहीही कारवाई केलेली नाही. आम्ही प्रार्थनेच्या विरोधात नसून भोंग्यांच्या विरोधात आहोत. त्यामुळे मशिदींवरील भोंगे उतरवले नाहीत, तर आम्ही सकाळी ध्वनीक्षेपकावर भजने लावू, अशी चेतावणी श्रीराम सेनेचे संस्थापक अध्यक्ष श्री. प्रमोद मुतालिक यांनी कर्नाटक सरकारला दिली आहे. ‘यापूर्वीही या संदर्भात मागणी करण्यात आली होती; मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळेच मशिदींच्या व्यवस्थापकांना याविषयी कळवून भोंग्यांचा वापर टाळायला हवा’, असे त्यांनी म्हटले.
बजरंग दलाचे सदस्य भारत शेट्टी यांच्या म्हणण्यानुसार मशिदींवरील भोंग्यांच्या विरोधातल्या आंदोलनाचा आरंभ बेंगळुरू येथील आंजनेय मंदिरापासून प्रारंभ होईल आणि मग सगळ्या राज्यभरात हे आंदोलन केले जाईल.
In a video message, Sriram Sena convener Pramod Muthalik said the Hindu outfits have been demanding that the loudspeakers on mosques should be banned and the Supreme Court’s order on noise pollution implemented. https://t.co/RhPFle2Kzz
— The Bridge Initiative (@bridgeinit) April 5, 2022
कर्नाटकातील मंदिरांमध्ये पहाटे नामजप चालू करण्यासाठी अभियान राबवणार ! – काली मठाचे पुजारी योगेश्वर ऋषी कुमार स्वामी
काली मठाचे पुजारी योगेश्वर ऋषी कुमार स्वामी यांनी म्हटले की, राज्यातील सर्व मंदिरांमध्ये पहाटे नामजप आणि श्लोकपठण करण्यासाठी एक अभियान राबवणार आहे. काही आठवड्यांपूर्वी त्यांना एक मशीद पाडण्याचे आवाहन केल्याच्या प्रकरणी अटक करण्यात आली होती.
मुसलमानांना विश्वासात घेऊन यावर उत्तर शोधता येईल ! – राज्याचे मंत्री के.एस. ईश्वरप्पा
कर्नाटकातील मंत्री के.एस्. ईश्वरप्पा यांनीही या मागणीचे समर्थन केले आहे. ते म्हणाले, ‘‘मुसलमानांना विश्वासात घेऊन या प्रश्नावर उत्तर शोधता येईल. रुग्ण आणि विद्यार्थी यांना होणारा त्रास लक्षात घेता, ते आवश्यक आहे. महाराष्ट्रात मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे उतरवण्याची मागणी केली होती; तसेच ध्वनीक्षेपकावर हनुमान चालिसा लावणार असल्याचेही म्हटले होते; मात्र अशा पद्धतीने थेट रस्त्यावर भिडण्याची भाषा केल्यास त्यातून २ समुदायामध्ये संघर्ष उद्भवू शकतो. त्यामुळेच मुसलमान बांधवांनी मशिदीपुरताच भोंग्यांचा वापर केल्यास त्याचा इतर नागरिकांना त्रास होणार नाही.’’
उच्च न्यायालयाचाच निर्णय असला, तरी सर्वांना तो मानण्याची सक्ती केली जाऊ शकत नाही ! – मुख्यमंत्री बसवराज बोम्माई
Karnataka CM Basavaraj Bommai Says ‘Mosque Loudspeakers Won’t Be Removed Forcefully’https://t.co/cjHGuiMCFF#Karnataka #BasavarajBommai #Loudspeakers #Mosque @BSBommai @BJP4India
— LatestLY (@latestly) April 5, 2022
भोंग्यांविषयी उच्च न्यायालयाचाचा आदेश आहे; मात्र तो मानण्यासाठी लोकांवर सक्ती केली जाऊ शकत नाही. संबंधिताांशी चर्चा करून त्यांना समजावले पाहिजे. हे केवळ अजानच्या संदर्भातच नाही, तर सर्वच भोंग्यांविषयी आहे. त्यामुळे यावर लवकरच निर्णय घेऊ, अशी प्रतिक्रिया कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी व्यक्त केली आहे.