न्यूयॉर्कच्या ‘टाइम्स स्क्वेअर’वर पहिल्यांदाच सामूहिक नमाजपठण !
सामाजिक माध्यमांतून संमिश्र प्रतिक्रिया !
अमेरिकी लोक स्वतःला मानवतावादी आणि धर्मनिरपेक्षतावादी दाखवण्यासाठी अशा समाजविरोधी कृत्यांना प्रोत्साहन देतात. याचे परिणाम येणार्या काळात त्यांच्या लक्षात येतील !
न्यूयॉर्क (अमेरिका) – शहरातील प्रसिद्ध ‘टाइम्स स्क्वेअर’ या सार्वजनिक ठिकाणी प्रथमच शेकडो मुसलमानांकडून सामूहिक नमाजपठण करण्यात आले. शनिवार, ३ एप्रिल या दिवशी हे नमाजपठण करण्यात आले. या नमाजपठणाच्या आयोजकांनी सांगितले की, इस्लाम हा शांततेचा धर्म आहे. इस्लामविषयी जगभरात चुकीच्या समजुती आहेत. आम्ही सर्वांना आमच्या धर्माविषयी सांगू इच्छित होतो.
सैकड़ो मुस्लिमों ने Times Square पर पढ़ी नमाज़, दुनिया को बताना चाहते थे- ‘इस्लाम अमनपसंद है…’ #TimesSquare #Namaz #NewYorkCity https://t.co/QeUp2n7uum
— Prime News UP/UK (@PrimeNewsUPUK) April 5, 2022
१. सामाजिक माध्यमांतून यावर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. अनेकांनी जनतेला त्रास देऊन सार्वजनिक ठिकाणी नमाजपठण करण्याचा विरोध केला, तर काही जणांनी नमाजपठणाचे समर्थन केले.
Namaz at Times Square !
Is U.S. preparing for a Bigger 9/11 ??
pic.twitter.com/dudi7uCZnZ— Savyasachi5873 (@Jaya41757249) April 5, 2022
२. संयुक्त अरब अमिरातमधील हसन सजवानी यांनी ट्वीट करून म्हटले, ‘न्यूयॉर्क शहरात २७० मशिदी आहेत आणि प्रार्थना करण्यासाठी त्या योग्य जागा आहेत. लोकांना रस्त्यावर नमाजपठण करण्याची आवश्यकता नाही. इस्लाम आम्हाला असे वागायला शिकवत नाही.’
३. खलीफा नावाच्या व्यक्तीने म्हटले की, मी एक मुसलमान आहे; मात्र टाइम्स स्क्वेर येथे नमाजपठणाचे समर्थन करत नाही. ‘इस्लाम आक्रमण किंवा घुसखोरी करणारा धर्म आहे’, असा चुकीचा संदेश येथून जाऊ शकतो.’