जर्मनी आर्थिक मंदीच्या उंबरठ्यावर ! – डॉयचा बँक
बर्लिन (जर्मनी) – युरोपची सर्वांत मोठी अर्थव्यवस्था असलेली जर्मनी आर्थिक मंदीच्या उंबरठ्यावर आहे, असे आता तेथील मुख्य बँक ‘डॉयचा’चे म्हणणे आहे. रशिया-युक्रेन संघर्षावरून जिथे बहुतेक युरोपीय देशांनी रशियाचा नैसर्गिक वायू आणि तेल यांची आयात न करण्याचा निर्णय घेतला, तिथे रशियावर मोठ्या प्रमाणात अवलंबून असलेला जर्मनी मात्र त्यासंदर्भात सतर्कतेने पावले उचलत आहे.
जर्मनीला लागणार्या नैसर्गिक वायूपैकी तब्बल ५५ टक्के भाग रशियाकडून आयात केला जातो. तेलाच्या संदर्भात हे प्रमाण ४० टक्के आहे. त्यामुळे जर जर्मनीला रशियाकडून या गोष्टींची आयात थांबली, तर जर्मनीमध्ये आर्थिक मंदी येणे जवळपास निश्चित असल्याचे मत ‘डॉयचा बँक’चे मुख्य कार्यकारी अधिकारी ख्रिश्च्यन स्वुइंग यांचे म्हणणे आहे.