कुरकुंभ (पुणे) येथील रसायन चोरीप्रकरणी १० आरोपींना अटक !
कुरकुंभ (पुणे) – दौंड तालुक्यातील कुरकुंभ येथील औद्योगिक वसाहतीतील मेल्झर केमिकल्स प्रा. लि. या आस्थापनामधून ५ मार्च या दिवशी ४८ लाख ५० सहस्र ९१४ रुपये मूल्याच्या ‘नायट्रो मिथेन’ या रसायनाची चोरी झाली होती. या चोरीच्या अन्वेषणासाठी पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी विविध पथके सिद्ध करून ठिकठिकाणी पाठवली होती. या पथकांनी पूर्वी २ आणि आता १० आरोपींना अटक केली आहे. त्यांच्याकडून १३ लाख ६२ सहस्र ७२९ रुपयांचा मुद्देमाल शासनाधीन केल्याची माहिती पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी दिली आहे.