पुणे येथे गुजरात टायटन विरुद्ध देहली कॅपिटल क्रिकेट सामन्यावर सट्टा; तिघांना अटक, एक पसार !
पुणे – येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या क्रिकेट मैदानामध्ये २ एप्रिल या दिवशी आय.पी.एल्.चा गुजरात टायटन विरुद्ध देहली कॅपिटलचा सामना खेळवला गेला. त्या वेळी पिंपरी येथील ‘वैभव पॅराडाईज’ या इमारतीत सामन्यावर सट्टा खेळला जात असल्याची माहिती गुंडाविरोधी पथकाला मिळाली. तेथे धाड टाकून २७ लाख रुपये रोख आणि ८ भ्रमणभाष शासनाधीन करण्यात आले. या प्रकरणी ३ जणांना अटक केली असून चौथा आरोपी सनी सुखेजा याचे अन्वेषण पोलीस करत आहेत.