कथित पर्यावरणप्रेमी मेधा पाटकर यांच्या संस्थेला कोट्यवधी रुपयांची अवैध देणगी मिळण्याचे आरोप !
-
मुंबईच्या ‘माझगाव डॉक’ या सरकारी आस्थापनाकडूनही तब्बल ६२ लाख रुपयांची देणगी !
-
तब्बल १७ वर्षे संस्थेच्या अपव्यवहाराविषयी काहीच माहिती नाही !
|
नवी देहली – कथित पर्यावरणप्रेमी मेधा पाटकर यांच्या ‘नर्मदा नवनिर्माण अभियान (एन्.एन्.ए.)’ या संस्थेला संदिग्ध रूपाने कोट्यवधींची देणगी प्राप्त झाल्याच्या विरोधात तक्रार करण्यात आली आहे. अंमलबजावणी संचालनालय, महसूल गुप्तचर संचालनालय आणि आयकर विभाग यांच्याकडे वेगवेगळ्या तक्रारी प्रविष्ट करण्यात आल्या आहेत. पाटकर यांच्या संस्थेला संदिग्ध देणगी मिळण्याचा प्रकार तब्बल १७ वर्षे उजेडात आला नाही. गाझियाबादचे संजीवकुमार झा यांनी ही तक्रार केली आहे.
एकाच दिवशी २० बँक खात्यांवरून एकाच रकमेचे एकूण १ कोटी १९ लाख रुपयांहून अधिकचे दान !
नर्मदा नवनिर्माण अभियानाची स्थापना ५ मार्च २००४ या दिवशी झाली. १८ जून २००५ या दिवशी ‘बँक ऑफ इंडिया’च्या संस्थेच्या खात्यावर २० वेगवेगळ्या बँक खात्यांवरून प्रत्येकी ५ लाख ९६ सहस्र २९४ रुपये म्हणजे एकूण १ कोटी १९ लाख २५ सहस्र ८८० रुपये दान मिळाल्याची नोंद झाली. तक्रारकर्त्याच्या म्हणण्यानुसार एकाच दिवशी एवढ्या खात्यांवरून एकाच रकमेचे दान मिळणे संदिग्धता दर्शवते. तसेच दानकर्त्यांपैकी पल्लवी भालेकर नावाची महिला वर्ष २००५ मध्ये अल्पवयीन होती. (यामध्ये निश्चितच संदिग्धता असूनही याविरोधात ‘बँक ऑफ इंडिया’च्या अधिकार्यांनी कारवाई करायला हवी होती; परंतु तसे झालेले दिसत नाही. त्यामुळे या बँकेच्या अधिकार्यांवरही कारवाई होणे आवश्यक आहे ! – संपादक)
‘मझगांव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड’कडूनही ६२ लाख रुपयांचे दान !
एवढेच नव्हे, तर जानेवारी २०२० ते मार्च २०२१ या १४ मासांच्या कालावधीत मुंबईतील ‘मझगांव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड (एम्.डी.एल्.)’ या आस्थापनाकडून ‘नर्मदा नवनिर्माण अभियान’ला ६ टप्प्यांमध्ये एकूण ६२ लाख रुपयांचे दान देण्यात आले. एम्.डी.एल्. आस्थापन हे भारतीय संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत येणारा उपक्रम आहे. या आस्थापनाकडून भारतीय नौदलासाठी युद्धनौका आणि पाणबुड्या बनवल्या जातात. या पार्श्वभूमीवर अशा संस्थेला एवढ्या मोठ्या प्रमाणात दान देण्यात येणे, हा चिंतेचा विषय आहे, असे तज्ञांचे मत आहे.
नेहमीच लोककल्याणकारी योजनांना विरोध करणार्या मेधा पाटकर यांची चौकशी होणे आवश्यक !राष्ट्राच्या दृष्टीने महत्त्वाची असलेली प्रत्येक योजना अथवा धोरण यांना मेधा पाटकर यांचा नेहमीच विरोध राहिला आहे. मग ती नर्मदा नदीवर धरण बांधण्यासाठी राबवण्यात आलेली ‘सरदार सरोवर योजना’ असो, केंद्र सरकारच्या विविध परमाणू योजना असो अथवा हल्ली करण्यात आलेला ‘नागरिकत्व सुधारणा कायदा’ असो. पाटकर यांनी या सर्वच लोककल्याणकारी योजनांचा विरोध केला होता. |