श्रीलंकेच्या मंत्रीमंडळाचे त्यागपत्र
कोलंबो (श्रीलंका) – श्रीलंका सरकारमधील सर्वच्या सर्व २६ मंत्र्यांनी पदाचे त्यागपत्र दिले आहे; मात्र महिंदा राजपक्षे पंतप्रधानपदी कायम आहेत. देशातील सर्वपक्षांचे सरकार स्थापन करण्यात येणार असल्याने त्यांना मंत्रीमंडळात सहभागी करण्यात येणार आहे. या अनुषंगाने ४ जणांना मंत्रीपदाची शपथ देण्यात आली.
६०० नागरिक अटकेत !
३६ घंट्यांच्या संचारबंदीचे उल्लंघन केल्यावरून आणि सरकारविरोधी मेळावा आयोजित करण्याचा प्रयत्न केल्यावरून देशाच्या पश्चिम प्रांतात ३ एप्रिल या दिवशी ६०० हून अधिक लोकांना अटक करण्यात आली.
A string of cabinet ministers and the central bank governor have resigned in Sri Lanka, as protesters in the capital defy curfew orders amid the country’s worst economic crisis in decadeshttps://t.co/Dz1oQ6XEyC
— CNN International (@cnni) April 4, 2022