प्रवीण दरेकर यांची मुंबई पोलिसांकडून ३ घंटे चौकशी !
मुंबई – मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदाच्या निवडणुकीसाठी मजूर म्हणून स्वत:ची नोंदणी केल्याच्या प्रकरणी ४ एप्रिल या दिवशी मुंबई पोलिसांनी अधिकोषाचे माजी अध्यक्ष आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांची ३ घंटे चौकशी केली. चौकशीनंतर प्रसिद्धीमाध्यमांपुढे बोलतांना प्रवीण दरेकर यांनी कारवाई करण्यासाठी पोलिसांवर सरकारचा प्रचंड दबाव असल्याचे म्हटले.