सूक्ष्मातून ज्ञान मिळवण्यातील धोका !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे ज्ञानाविषयी मार्गदर्शन

परात्पर गुरु डॉ. आठवले

‘अन्नातून विषबाधा केली जाते, तसे ज्ञान मिळवत असतांना काही वेळा अनिष्ट शक्ती सूक्ष्मातून त्या ज्ञानामध्ये त्रासदायक शक्ती सोडतात. या त्रासदायक शक्तीमुळे पुढे ज्ञानप्राप्तकर्त्या साधकांवर आणि ज्ञान वाचतांना काही वाचकांवर शारीरिक, मानसिक किंवा आध्यात्मिक अशा विविध स्तरांवर दुष्परिणाम होतांना दिसून येतात.’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले (१८.११.२०२१)

  • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.