गोरखनाथ मंदिरावर जिहाद्याकडून कोयत्याद्वारे आक्रमण !

  • २ पोलीस घायाळ

  • आक्रमण करतांना ‘अल्लाहू अकबर’च्या घोषणा !

  • आक्रमणकर्ता मुर्तजा याच्याकडे आयआयटी मुंबईची केमिकल इंजिनिअरची पदवी

प्रखर हिंदुत्वनिष्ठ आणि उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ या मंदिराचे महंत आहेत. त्यामुळे हे मंदिर हिंदुत्वाचे केंद्र आहे. ते हिंदूंच्या अस्मितेचे प्रतीक बनले आहे. त्यामुळेच ते जिहाद्यांच्या डोळ्यांत खुपते. हिंदूंच्या अस्मितेवर आघात करण्यासाठीच हे आक्रमण करण्यात आले नसेल कशावरून ?

गोरखपूर (उत्तरप्रदेश) – येथील प्रसिद्ध गोरखनाथ मंदिरावर अहमद मुर्तजा अब्बासी नावाच्या तरुणाने ३ एप्रिलच्या रात्री ‘अल्लाहू अकबर’च्या (‘अल्ला महान आहे’च्या) घोषणा देत कोयत्याद्वारे आक्रमण केले. यात २ पोलीस घायाळ झाले. येथे तैनात सुरक्षारक्षकांनी नंतर मुर्तजाला पकडले. मुर्तजा मंदिरात घुसण्याचा प्रयत्न करत असतांना ही घटना घडली. राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ या मंदिराचे महंत आहेत. या मंदिराला यापूर्वीही जिहादी आतंकवाद्यांकडून लक्ष्य करण्याचा प्रयत्न झाला आहे. त्यामुळे येथे मोठा बंदोबस्त असतो.

१. पकडण्यात आलेल्या जिहादी मुर्तजा गोरखपूरच्याच सिव्हिल लाईन येथील रहाणारा आहे. त्याने आयआयटी मुंबईमधून केमिकल इंजिनिअरिंगची पदवी मिळवलेली आहे. तो सायंकाळी या मंदिराच्या ठिकाणी आला होता. मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न करत असतांना त्याला सुरक्षारक्षकांनी तपासणीसाठी रोखले. तेव्हा त्याने अल्लाहू अकबरच्या घोषणा देत त्याच्याकडील कोयता बाहेर काढला आणि पोलिसांवर आक्रमण केले. यात गोविंद गौड आणि अनिल पासवान हे दोघे घायाळ झाले.

२. यानंतर मुर्तजा पळून जाण्याचा प्रयत्न करू लागल्यावर अन्य पोलिसांनी आणि उपस्थित नागरिकांनी त्याचा पाठलाग केला. जवळपास एक घंटा त्याला पकडण्याचा प्रयत्न चालू होता. (एका जिहाद्याला पकडण्यासाठी १ घंटा वेळ घेणारे पोलीस सशस्त्र जिहादी आतंकवाद्यांचा सामना कसा करणार ? – संपादक) नंतर त्याला पकडण्यात यश आले. नागरिकांनी त्याला पकडून चोपल्याने तो घायाळ झाला.

३. पोलिसांनी त्याची चौकशी केल्यावर त्याने त्याचे नाव आणि तो कुठून आला आहे, हे सांगितले. तो ३ एप्रिललाच सकाळी मुंबईहून गोरखपूर येथे पोचला होता. पोलिसांनी त्याच्याकडून २ कोयते, पॅन कार्ड आणि एक भ्रमण संगणक जप्त केला. पोलीस, तसेच आतंकवादविरोधी पथक यांच्याकडून त्याची चौकशी केली जात आहे. या आक्रमणामागे त्याचा काय उद्देश होता, याची माहिती घेतली जात आहे.

४. पोलिसांनी मुर्तजा याच्या घरी जाऊनही चौकशी चालू केली आहे. घराची झडतीही घेण्यात आली. तसेच त्याच्या मुनीर अहमद या वडिलांना कह्यात घेण्यात आले आहे. त्यांची चौकशी करण्यात येत आहे.

५. मुर्तजा कुटुंब पूर्वी मुंबईत रहात होते. नातेवाइकांचे म्हणणे आहे की, मुर्तजा याची मानसिक स्थिती चांगली नाही. (हिंदूंच्या मंदिरांवर आक्रमण करणार्‍या, मंदिरांत चोर्‍या करणार्‍या किंवा दंगल घडवणार्‍या जिहाद्यांची मानसिक स्थिती चांगली नसते, असे नेहमीच सांगून त्यांच्या गुन्ह्यांवर पांघरूण घालण्याचा प्रयत्न केला जातो, हे लक्षात घ्या ! – संपादक) २ एप्रिलपासून तो घरातून बेपत्ता होता. त्याचा शोध घेण्यात येत होता.