अमरोहा (उत्तरप्रदेश) येथे धार्मिक स्थळात अज्ञातांनी जाळली धार्मिक पुस्तके !

  • धर्मिक स्थळही पेटवून दिले

  • उत्तरप्रदेशमध्ये धार्मिक तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न

अमरोहा (उत्तरप्रदेश) – अमरोहा जिल्ह्यातील काकर सराय गावातील एका दफनभूमीत असलेल्या धर्मिक स्थळाला अज्ञातांनी आग लावली. यामध्ये काही धार्मिक पुस्तके जाळण्यात आली. या घटनेची माहिती मिळताच कोणताही तणाव निर्माण होऊ नये, यासाठी पोलिसांनी मोठ्या प्रमाणात बंदोबस्त ठेवला आहे. आग लावण्यात आल्याचा प्रकार रात्री घडला. येथे सकाळी स्वच्छतेला येणार्‍या नाजिम याला तो येथे आल्यावर लक्षात आले. त्यानंतर येथे मोठ्या संख्येने लोक गोळा झाले आणि त्यांनी संताप व्यक्त केला.