अफगाणिस्तानमध्ये तालिबानकडून अफूची शेती करण्यावर बंदी !

काबूल (अफगाणिस्तान) – अफगाणिस्तानमध्ये तालिबान सरकारकडून अफूच्या शेतीवर बंदी घालण्यात आली आहे. येथील अफूचा जगभरात पुरवठा होतो. या दिवसांत संपूर्ण अफगाणिस्तानमध्ये अफूची शेती करण्यास आरंभ होतो. त्या पार्श्‍वभूमीवर तालिबानने वरील चेतावणी दिली आहे. अफूची शेती करणार्‍याचे शेत जाळून टाकून संबंधित व्यक्तीला कारागृहात डांबण्यात येईल, अशीही चेतावणी तालिबानने दिली आहे. अफगाणिस्तानमध्ये यापूर्वी वर्ष १९९० मध्ये अफूची शेती करण्यावर बंदी होती.