पू. बाबा, आशीर्वाद द्या मला, व्हावे मी तुमची ‘साधनेतील बेटी’ ।
चैत्र शुक्ल तृतीया (४.४.२०२२) या दिवशी सनातनचे ७ वे संत पू. पद्माकर होनप यांचा ७४ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांच्या मुलीने त्यांच्याप्रती व्यक्त केलेली काव्यरूपी कृतज्ञता पुढे दिली आहे.
पू. पद्माकर होनप यांच्या ७४ व्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या चरणी सनातन परिवाराच्या कृतज्ञतापूर्वक नमस्कार !
साधनेचे संस्कार करूनी बालपणी ।
सोपवले तुम्ही मला गुरूंच्या हाती ।। १ ।।
जेव्हा निघाले मी पूर्णवेळ साधना करण्या आश्रमात ।
म्हणाले, आता हेच तुझे ध्येय, फिरायचे नाही पाठी, हे असू दे स्मरणात ।। २ ।।
आले माझ्या साधनेत अनेक चढ-उतार ।
असे त्यांचा आधार आणि प्रेम देणारा हात माझ्या पाठीवर ।। ३ ।।
असती जरी स्वभावदोष आणि अहं तुझ्यात ।
तरी करत रहा साधना, गुरु आहेत समवेत, सांगत रहाती मला ते सतत ।। ४ ।।
आपण आपले करत रहायचे, गुरुचरणी सर्व अर्पायचे ।
अपेक्षाविरहित प्रयत्नांचा घे तू आनंद, शब्द हे तयांचे ।। ५ ।।
मी आहे आनंदी तुमच्या कृपेने ।
तुमच्यासम श्रद्धा वाढू द्या माझी, सर्वकाही होणारच आहे गुरुकृपेने ।। ६ ।।
गुरुकृपेने मला मिळाली तुमची सेवा ।
चाखायला मिळत आहे मला आनंद आणि भावजागृती यांचा मेवा ।। ७ ।।
कृतज्ञता गुरुचरणी असे अनंत ।
संत-पिता मिळाले मला जीवनात ।। ८ ।।
पू. बाबा, मी आहे तुमची पोटची बेटी ।
आशीर्वाद द्या मला, व्हावे मी तुमची ‘साधनेतील बेटी’ ।। ९ ।।
– सुश्री (कु.) दीपाली होनप (मुलगी), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३.४.२०२२)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |