सोलापूर येथे हिंदु राष्ट्र सेनेचे कार्यकर्ते पोलिसांच्या कह्यात !
सोलापूर – ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपट पाहिल्यानंतर चित्रपटगृहाच्या बाहेर ‘मुसलमानांवर आर्थिक बहिष्कार घाला. त्यांच्याशी कोणतेही आर्थिक व्यवहार करू नका’, असे आवाहन करणाऱ्या दोघांना येथील एम्.आय.डी.सी. पोलिसांनी कह्यात घेतले आहे. श्री. आनंद मुसळे आणि हिंदु राष्ट्र सेनेचे शहराध्यक्ष श्री. रवि गोणे अशी त्यांची नावे आहेत. सोलापूर येथे हिंदु राष्ट्र सेनेच्या वतीने महिला आणि युवकांना हा चित्रपट दाखवण्यात आला होता. (पोलीस अशी तत्परता धर्मांधांनी केलेल्या गुन्ह्यांत का दाखवत नाहीत ? अनेक ठिकाणी धर्मांधांची ‘थूक जिहाद’सारखी प्रकरणे समोर येतात, तेव्हा पोलीस त्यांना त्वरित कह्यात का घेत नाहीत ? यावरूनच प्रशासनाच्या धर्मनिरपेक्षतेची निरर्थकता लक्षात येत ! – संपादक)