अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करणार्या दोघा धर्मांधांना अटक
अशा वासनांध धर्मांधांना शरीयत कायद्यानुसार हात-पाय तोडण्याची शिक्षा करण्याची कुणी मागणी केली, तर आश्चर्य वाटू नये !
सहारनपूर (उत्तरप्रदेश) – येथे चिलकाना पोलीस ठाण्याच्या सीमेतील एका गावामध्ये २५ मार्च या दिवशी एका अल्पवयीन मुलीवर आमिर आणि आसिफ या दोघांनी सामूहिक बलात्कार केला होता. त्यांना अटक करण्यात आली आहे. हे दोेघे भाऊ आहेत. त्यांच्या वडिलांनी पीडितेच्या कुटुंबियांना धमकावल्याचाही आरोप आहे. ‘दोघांना कह्यात न दिल्यास घरावर बुलडोजर चालवून ते पाडण्यात येईल’, अशी चेतावणीही पोलिसांनी त्यांच्या वडिलांना दिली होती. पोलिसांनी त्यांच्या घराचा जीना बुलडोजरद्वारे पाडलाही होता.