स्वातंत्र्यपूर्वकाळात इंग्रजांनी चालू केलेली न्यायालयांना सुट्या देण्याची प्रथा अजूनही चालू असणे आणि परिणामस्वरूप जनतेच्या न्यायदानाला विलंब होणे
‘इंग्रज न्यायमूर्तींनी वर्षभरातून अनुमाने दोनदा मायदेशी, म्हणजे इंग्लंडला जाण्याचा शिरस्ता (पद्धती) होता. किमान एकदा तरी ते जातच असत. त्याकाळी हवाई मार्गाने जाणे पुष्कळ खर्चिक होते. तसेच आताच्या मानाने साधनांची उपलब्धताही अल्पच होती. त्यामुळे ते इंग्लंडला जाण्यासाठी जहाजाचा उपयोग करत. इंग्लंडला जाणारी जहाजे भारतीय लूट आणि सामग्री यांनी भरगच्च असायची. भारतीय बंदरातून इंग्लंडला पोचायला जहाजांना पुष्कळ कालावधी लागायचा. तेथून परत येतांनाही तेवढेच दिवस लागायचे. त्यामुळे त्या कालावधीमध्ये भारतातील न्यायालये बंद असायची. तेव्हापासून न्यायालयांना दीर्घ कालावधीची सुट्टी देण्याची पद्धत चालू झाली. सद्यःस्थितीत या सुट्या सोयिस्करपणे तशाच चालू ठेवण्यात आल्या आहेत.’ – एक माजी पोलीस अधिकारी