वायफड (जिल्हा धुळे) येथील सरपंचांना मारहाण
आरोपीला अटक !
वर्धा – जिल्ह्यातील वायफड गावात चालू असलेल्या विकासकामांच्या जागेवरील वाळू चोरून नेत असतांना सरपंच विजय राऊत यांनी आरोपी अरुण बावणे याला हटकले. या प्रकरणी राऊत यांनी पुलगाव पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केल्यानंतर पोलिसांनी आरोपी बावणे याला अटक केली आहे. यावरून आरोपी बावणे याने सरपंचाला शिवीगाळ करून दगडाने त्यांच्या डोक्यावर मारहाण केली. यात राऊत यांचे डोके फुटल्याने ते घायाळ झाले आहेत. गावात रस्त्याच्या बांधकामासाठी वाळू आणून ती रस्त्याच्या कडेला कंत्राटदाराने ठेवली होती.